सातारा : कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयासमवेत फिरायला गेलेल्या मामा भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. निकिता अजय पुनदीर (वय ३२), उदय जगन्नाथ पवार (वय ४५, रा. वेळेकामथी, सध्या रा. मुंबई) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मामा-भाचीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेळेकामथी (ता. सातारा) येथील दत्तजयंतीच्या यात्रेनिमित्त मामा-भाची कुटुंबीयासमवेत वेळेकामथी येथे आले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पवार आणि पुनदीर कुंटुंबीय कण्हेर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक निकितीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी मामा उदय पवार यांनी धरणात उडी घेतली. परंतु निकिताने मामाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले.कुटुंबाच्या डोळ्या देखत मामा-भाची बुडाल्याने कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केली. परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वेळेकामथी येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी तत्काळ पोहोचले.महाबळेश्वर ट्रेकर्स आणि परिसरातील युवकांनी धरणात उतरून शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत दिसून आले. दोन्ही मृतदेह वर काढताना निकिताचा मृतदेह अचानक निसटला. मात्र, मामाचा मृतदेह बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले. निकिता मृतदेह खोल पाण्यात सटकल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरूच होती. दरम्यान, निकिता पुनदीर ही उत्तराखंडमधील असून ती सध्या मुंबई येथे स्थायिक झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.
कण्हेर धरणात मामा-भाचीचा बुडून मृत्यू, मामाचा मृतदेह सापडला ; भाचीचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 11:54 AM
कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयासमवेत फिरायला गेलेल्या मामा भाचीचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. निकिता अजय पुनदीर (वय ३२), उदय जगन्नाथ पवार (वय ४५, रा. वेळेकामथी, सध्या रा. मुंबई) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मामा-भाचीचे नाव आहे.
ठळक मुद्दे कण्हेर धरणात मामा-भाचीचा बुडून मृत्यू, मामाचा मृतदेह सापडलाभाचीचा शोध सुरू ; कुटुबीयांसमावेत गेले होते फिरायला.