शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

..तर गाठ आमच्याशी, शरद पवारांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादीकडून दहिवडीत रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 6:18 PM

नवनाथ जगदाळे दहिवडी : खासदार शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी ...

नवनाथ जगदाळेदहिवडी : खासदार शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहिवडीत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘शरद पवारांच्या केसालाही धक्का लागला, तर गाठ आमच्याशी आहे,’ असा इशारा देण्यात आला. या धमकीमुळे राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते संतापले असून, राजकारण तापले आहे.माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शासकीय विश्रामगृहापासून फलटण चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून फलटण चौकात रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.श्रीराम पाटील म्हणाले, ‘हे एवढं सोप्पं आहे का? पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रकार सहन केले जाणार नाहीत.’ प्रशांत वीरकर म्हणाले, ‘या सरकारने जातीयवाद्यांना आवर घातला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल.’‘आमच्या नेत्यांना दिलेल्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत. दिल्लीमधील आंदोलन असेल, या रेल्वे अपघात. यासारखे विषय दडपण्यासाठी राज्यात कट कारस्थाने रचली जात आहेत, तसेच अनेक वेळा शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका करून माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्याचा जो धंदा चालू आहे. तो तत्काळ थांबवा, अन्यथा होणाऱ्या परिणामास समाेरे जाण्याचीही तयारी ठेवा,’ असा इशारा महेश जाधव यांनी दिला.सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना धमकीच्या निषेधाचे निवेदन देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, सुभाष नरळे, बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, तानाजी कट्टे, खटाव तालुका महिलाध्यक्षा डाॅ.प्रियांका मानेंसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस