लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : शासनाने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण हे शासन लबाड असून शेतकऱ्यांना फसवत आहे. त्यामुळे शेतकरी एकत्र आला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापक कॉ. अँड. सयाजीराव पाटील यांनी केले.शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि. २) सकाळी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाच्या पदाधिऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सभेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. सभेस शेतकरी संघटनेचे दादासो यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य मारूतराव जाधव, माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, व्यापारी सिद्धार्थ किरतकर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.कॉ. पाटील म्हणाले, शासनाने तातडीने शेतकऱ्यांना कर्ममाफी जाहीर करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. या मागण्या मान्य न झाल्यास संप असाच सुरू राहिल. यावेळी दादासो यादव, मारूतराव जाधव, माजी पंचायत सोमनाथ जाधव यांची भाषणे झाली. यानंतर येथील भाजीमंडई मधील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे शेतकरी संपास पाठिंबा देत भाजी मंडई बंद ठेवली.
मंडईत सन्नाटा... दूध अन् भाजी रस्त्यावर
By admin | Published: June 02, 2017 11:25 PM