सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा ेकेल्यानंतर झाडू बनविणाऱ्यांना आणि विकणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयांत ही मोहीम सुरू असल्याने नगांवर खपणारे झाडू अचानक डझनांवर विकत घेतले जाऊ लागले आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने सर्वत्र जोरदार प्रचार केला होता. या पक्षाचे निवडणूक चिन्हच ‘झाडू’ हे असल्याने त्यावेळीही झाडूला मोठी मागणी होती. ‘आप’च्या प्रचारवाहनांवर झाडू झळकत होते. पदयात्रा काढणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही हातात झाडू दिसत होते. नंतर अचानक लुप्त झालेले झाडू आता स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या संख्येने प्रकटले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य अशा सगळ्या ‘खास’ व्यक्तींच्या हाती ‘आम’चा झाडू दिसू लागला आहे. शाळा-महाविद्यालयांचे आवार, शासकीय कार्यालयांचे आवार चकाचक होऊ लागले आहे. स्वच्छता मोहीम सर्वत्र जोमाने राबविली जात असल्याने झाडूला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.जिल्ह्यातील अनेक शहरांत डेंग्यू, हिवताप असे साथींचे आजार गेल्या महिन्यापासून थैमान घालत आहेत. स्वच्छता अभियान राबविण्यास त्यामुळे दुहेरी निमित्त मिळाले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था स्वच्छतेच्या मोहिमेत उतरल्यामुळे आजार पसरविणाऱ्या विषाणूंच्या नायनाटाबरोबरच शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य राखले जात आहे. परंतु या सर्व घडामोडींचा आर्थिक सुपरिणाम म्हणून झाडू विकणाऱ्यांना चांगला व्यवसाय मिळू लागला आहे. शहरात झाडूंची आवक आणि विक्री चांगलीच वाढली आहे. (प्रतिनिधी)५महाबळेश्वर, पाचगणी, वाई, फलटण या तालुक्यांमध्ये खराटे येथूनच जातात. आमच्या दुकानातील केवळ खराट्यांची दरमहा उलाढाल पंधरा ते वीस हजारांवर जाते. स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून खराट्यांच्या उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे.- एम. सुनीलकुमार (जादूगार), विक्रेता‘मालवण खराट्या’ला मागणीखराट्यांमध्ये मालवण खराटा, केरळ खराटा आणि महाराष्ट्र खराटा असे तीन प्रकार आहेत. साताऱ्यात मालवण खराट्याला जास्त मागणी आहे. या खराट्याच्या केवळ काड्या सांगलीहून येतात. याला ‘बोरू काडी’ म्हणतात. खराटा साताऱ्यातच तयार केला जातो. प्रकारानुसार खराट्यांच्या किमती पंधरा रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत आहेत. याखेरीज ‘चायनीज खराटा’ नावाचा प्रकार चौपाटीवरील खाद्यपदार्थ बनविण्याचे तवे साफ करण्यासाठी वापरला जातो, तोही येथेच तयार होतो.
‘खास’ माणसांच्या हाती ‘आम’चा झाडू!
By admin | Published: November 21, 2014 11:45 PM