शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

मनोमिलनाच्या पारड्यात नव्या गटाचा खडा!

By admin | Published: August 30, 2016 11:02 PM

उत्सुकता शिगेला : खेड की गोडोली ग्रामीण... नवीन गटाकडे सर्वांच्याच नजरा--सातारा जिल्हापरिषद-- शह-काटशह

सागर गुजर --सातारा --जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीनंतर सातारा तालुक्याचे पारडे आणखी जड होणार आहे. तालुक्याची जिल्हा परिषद सदस्य संख्या ९ ऐवजी १० होणार असल्याने कऱ्हाड तालुक्यानंतर सातारा तालुक्याचा दबदबा आणखी वाढणार आहे. हा वाढणारा गट व पंचायत समितीचे दोन गण नेमके कुठले या बाबत सातारा तालुक्यातील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नगरविकास आघाडी यांच्या मनोमिलनाची सत्ता बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. सध्याच्या घडीला सातारा तालुक्यातील ९ सदस्य जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे (कोडोली), संदीप शिंदे (कोंडवे), समृद्धी जाधव (नागठाणे), वनिता पोतेकर (शेंद्रे) हे सदस्य खासदार उदयनराजे भोसले गटाचे आहेत. तर किरण साबळे-पाटील (शिवथर), जितेंद्र सावंत (लिंब), राजू भोसले (परळी), सतीश चव्हाण (देगाव) हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे आहेत. दोन्ही गटांचे प्रत्येकी चार सदस्य प्रतिनिधीत्व करत आहेत. मत्यापूर येथील मंगल भीमराव घोरपडे या अपक्ष प्रतिनिधीत्व करत आहेत.आता वाढलेला एक गट व दोन गणांमुळे जिल्हा परिषदेत एक व सातारा पंचायत समितीमध्ये दोन नव्या सदस्यांना संधी मिळणार आहे. पंचायत समितीमध्ये कविता चव्हाण (ठोसेघर), सूर्यकांत पडवळ (भरतगाववाडी), धर्मराज घोरपडे (गवडी), विजय काळे (तासगाव), शोभा पवार (खेड), राहुल शिंदे (पाटखळ), संजय पाटील (शाहूपुरी), उज्ज्वला कदम (मालगाव), सोमनाथ पवार (काळोशी), सुदर्शना चव्हाण (मापरवाडी), आनंदराव कणसे (संभाजीनगर), वनिता कण्हेरकर (गोडोली), नंदा भिसे (क्षेत्रमाहुली), कविता मेणकर (धावडशी), सुनीता सरडे (खोजेवाडी), प्रवीण धसके (वर्णे), विश्रांती साळुंखे (नागठाणे), जयवंत कुंभार (काशीळ) हे प्रतिनिधीत्व करत आहेत. पंचायत समितीमध्ये नवीन दोन सदस्य असतील. मत्यापूरच्या मंगल भीमराव घोरपडे या त्यांच्या गटातील राजकीय वलयाच्या आधारावर मनोमिलनाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या. कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातून त्यांचे चिरंजीव मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. आता मनोज घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात घोरपडेंना भाजपचे बळ मिळणार आहे. दरम्यान, नागठाणे गटाच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या समृद्धी जाधव यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याच्या हालचाली या गटात जोरदार झाल्या होत्या. या राजकीय हालचालींना उदयनराजेंच्या गटाने कैद करून ही निवडणूक बिनविरोध करून दाखविली. आता वाढलेला गट व दोन गणांसाठी जोरदार ‘लॉबिंग’ होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक मनोमिलनाच्या माध्यमातून झाली तर मात्र दोन्ही राजेंना जागा वाटपात कोणतीच अडचण राहणार नाही. वाढणारा गट व गण कोणता असणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शहरालगतच्या उपनगरांमध्ये वाढती लोकसंख्या विचारात घेता, शहरालगतचा एक गट व दोन गण वाढणार हे मात्र निश्चित आहे. निवडणूक आयोगाच्या गुगल मॅपमध्ये कुठला गट व दोन निश्चित होतील, हे लवकरच समजणार आहे. महत्त्व वाढविण्याचे उपदव्यापसातारा शहरासह संपूर्ण सातारा तालुक्यावर दोन राजेंमधल्या मनोमिलनाचा प्रभाव आहे. या प्रभावामुळे काहींचे महत्त्व वाढले तसेच काहींचे महत्त्व कमीही झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपले उपद्रव मूल्य दाखवून देण्यासाठी काही हालचाली मधल्या काळात झाल्या होत्या. नागठाणे गटाच्या पोटनिवडणुकीत अस्वस्थ राजकारणाचा नमुना पाहायला मिळाला होता.