शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

नव्वद कुटुंबांची कचऱ्यापासून खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:55 PM

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘स्वच्छ कºहाड सुंदर कºहाड’ असं स्वप्न बाळगत कºहाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने अनेक उपक्रम राबविले. संथ वाहणाºया कृष्णाबाईची स्वच्छताही केली; पण शहर व घरातील कचरा हा टाकायचा कुठे? असा प्रश्न काही कºहाडकरांना पडत आहे. अशात घरचा कचरा हा घरीच जिरवून त्यापासून खतनिर्मिती करण्याचे काम ...

संतोष गुरव ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘स्वच्छ कºहाड सुंदर कºहाड’ असं स्वप्न बाळगत कºहाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेने अनेक उपक्रम राबविले. संथ वाहणाºया कृष्णाबाईची स्वच्छताही केली; पण शहर व घरातील कचरा हा टाकायचा कुठे? असा प्रश्न काही कºहाडकरांना पडत आहे. अशात घरचा कचरा हा घरीच जिरवून त्यापासून खतनिर्मिती करण्याचे काम काही कुटुंबीय करीत आहेत. शहरात नव्वद कºहाडकर कुटुंबीय कचºयांपासून खत तयार करत शहर स्वच्छतेचा संदेश देत आहेत.या कुटुंबीयांकडून घरचा कचरा बाहेर न टाकता तो घरीच ठेवून घरच्या घरी त्यापासून कंपोस्ट तसेच गांडूळ खतनिर्मिती केली जातेय. तसेच ‘चला, कºहाड स्वच्छ ठेवू या,’ असा संदेश देत या कुटुबीयांनी शहर स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. कºहाड शहर हे कृष्णानदी काठावर वसले आहे. या शहरालगत असलेल्या नदी स्वच्छतेसाठी मध्यंतरी पालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यात सातत्य ठेवले गेल्यामुळे नदीकाठ आज स्वच्छ होऊ शकला.पालिकेच्या या नदी स्वच्छतेबरोबर शहर स्वच्छतेच्या मोहिमेत शहरातील नव्वद कुटुंबीयांनी देखील सहभाग घेतला आहे. एन्व्हायरो व पालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शहर ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात सहभागी होत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नव्वद कुटुंबांकडून घरचा कचरा घरीच जिरवला जात आहे. आजवर शहरात सुमारे नव्वद वैयक्तिक कंपोस्ट खत प्रकल्प साकारले आहेत. तर सहा नागरिकांनी वैयक्तिक गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. शिवाजी हौसिंग सोसायटी या उपक्रमात आघाडीवर आहे. अशा कुटुंबीयांतील काही सदस्यांनी तर पालिकेचे स्वच्छतादूत म्हणून प्रतिनिधित्व करीत शहरातही स्वच्छता केली आहे.घरच्या कचºयापासून खतनिर्मितीघरात साचणारा ओला व सुका कचरा. त्यामध्ये अन्नपदार्थ, झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ वस्तू, यातील ओला कचरा हा घर परिसरात असलेल्या परसबागेत काही कुटुंबीयांनी साठविला आहे. त्यासाठी त्यांना एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबकडून एक निळ्या रंगाचा लहान बॅरेल देण्यात आला आहे. त्यास चारही बाजूने छिदे्र पाडण्यात आली आहेत. घरातून दररोज जमा होणारा ओला कचरा या बॅरेलमध्ये टाकला जातो. सहा महिन्यांत हा बॅरेल भरल्यानंतर त्यातत उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार होते.फक्त दोनशे रुपये खर्चकºहाड शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्याकडेला कचरा पडू नये म्हणून पालिकेच्या वतीने कचरा कुंड्या हटवून त्याजागी सुंदर रांगोळी काढली आहे. या पालिकेस सहकार्य म्हणून कुटुंबीयांनी घरचा कचरा घरीच जिरवत खतनिर्मिती करण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यास फक्त दोनशे रुपये खर्च येत आहे.प्रत्यक्ष कृतीतून संदेशशहर स्वच्छ ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, असा संदेश आज अनेक लोकांकडून दिले जातात. पण प्रत्यक्षात ते कृतीत उतरवत नाहीत. मात्र, शिवाजी हौसिंग सोसायटीसह शहरातील काही सोसायटीतील या नव्वद कुटुंबांकडून आज हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला जात आहे. ‘होय, ‘आम्ही ठेवतो स्वच्छता तुम्हीही ठेवा.. ’असे सांगत चला, ‘कºहाड शहर स्वच्छ ठेवूया’, असा संदेश ही कुटुंबीय देत आहेत.खतनिर्मितीबरोबरच पर्यावरणपूरक उपक्रमांबाबत मार्गदर्शनकºहाड पालिकेच्या वतीने राबविलेल्या पर्यावरण उपक्रमांसह घरच्या घरीच कचरा साठवून त्यापासून गांडूळ तसेच कंपोस्ट खतनिर्मिती करण्याबाबत एन्व्हायरो नेचर फे्रंडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, पर्यावरणप्रेमी रमेश पवार व पालिका स्वच्छता दूतांकडून महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.गांडूळखत निर्मितीसाठी येतो कमी खर्च..कºहाड शहरात चाळीसहून अधिक कुटुंबांनी वैयक्तिक गांडूळ खत प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांसाठी त्यांना साडेतीन हजार रुपये खर्च आला आहे. शिवाजी हौसिंग सोसायटी येथे सर्वाधिक वैयक्तिक कंपोस्ट खत प्रकल्प आहेत.