शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

माणुसकीची भिंत आता फलटणमध्येही सुरू !

By admin | Published: December 29, 2016 10:23 PM

नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद : जमा झालेले कपडे ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोचणार; एक ट्रकभर कपडे दान

फलटण : साताऱ्यात सुरू असलेल्या माणुसकीच्या भिंतीला चांगला प्रतिसाद मिळत असून, आता ही ‘माणुसकीची भिंत’ फलटणमध्येही सुरू होत आहे. जमा झालेले कपडे ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत आणि ऊसतोड मजुरांपर्यंत पोहोचविली जाणार आहेत.‘वात्सल्य’ फाऊंडेशन आणि ‘हैप्पी पीपल’ सामाजिक संस्था यांच्या विद्यमाने ‘माणुसकीची भिंत’ हा प्रकल्प दुसऱ्यांदा राबविण्यात आला. या उपक्रमाला सातरकरांनी दातृत्वाचा उच्चांक गाठत जवळजवळ १ ट्रक भरेल एवढे कपडे दान केले. जवळजवळ ४० स्वयंसेवक सकाळपासून त्यावर काम करत होते. जमा झालेले कपडे घेणारे आणि देणारे यांचा गर्दीचा महापूर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. तर काही कार्यकर्ते वाहतूक व्यवस्था पाहत होते. येणाऱ्या कपड्यांचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती ‘वात्सल्य’ फाऊंडेशनचे शशिकांत पवार यांनी दिली. नागरिकांनी कपडे दान केल्यानंतर कपड्यांची वर्गवारी करणे हे मोठे काम स्वयंसेवकांकडून केले गेले. स्वयंसेवक म्हणून शाळकरी मुले पण काम करत होती. इथून पुढे काही कपडे आणि वस्तू दुर्गम भागात आणि ऊसतोड मजूर यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही ‘माणुसकीची भिंत’ मंगळवार, दि. १० जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. अजय गायकवाड यांनी समस्त सातारकरांचे आभार मानले.दरम्यान, ही ‘माणुसकीची भिंत’ आता फलटणमध्ये सुरू होत आहे. ‘ज्याच्याकडे जास्त आहे त्याने द्यावे’ ही संकल्पना आता घेऊन सातारा डिस्ट्रिक्ट अ‍ॅटोमोबाईल डीलर असोसिएशन, जैन सोशल ग्रुप फलटण, लाइयन क्लब फलटण, व्यापारी संघ तसेच सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारपासून फलटण येथील शासकीय विश्रामगृहासमोर ही ‘माणुसकीची भिंत’ असणार आहे. हा हा म्हणता ही संकल्पना देशभर काही मोजक्या शहरांमध्ये पोहोचली ती आता फलटणमध्येही. काही तरुण आणि वरिष्ठ लोक एकत्र आले. समाजासाठी असलेली सामाजिक बांधिलकी आणि समाजासाठी असलेले देणं हे यातून साकार होत आहे.ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्याकडे असलेले कपडे, स्वेटर्स, कानटोप्या, हातमोजे, चादरी, ब्लँकेट्स, चपला, बुट, लहान मुलांची खेळणी आणि कपडे माणुसकीच्या भिंतीला लटकवावित, असे आवहन करण्यात आले. (प्रतिनिधी)