प्रवीण जाधव ल्ल नाटोशीपाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील लोकांनी १९६० च्या दरम्यान कोयना धरण बांधत असताना आपली जमीन, घरे कोयना धरणासाठी मोठ्या मनाने शासनाच्या स्वाधीन केल्या आणि आपला जमिनीवरील हक्क सोडला. त्या बदल्यात शासनाकडून दिलेल्या अल्प जमिनीवर स्वत:चा संसार पुन्हा उभारला. यातील काहीजण विस्थापित झाले तर काहींचे प्रश्न अजून शासन दरबारी पडून आहे.डोंगरदऱ्याचा आसरा घेऊन आणि येथील भौगोेलिक आपत्तीचा सामना करत काही कुटुंबे राहिली. व त्यांना देण्यात आलेल्या जमिनीतून कष्ट करून आपल्या संसाराचा गाडा रेटत होती़ या डोंगरदऱ्यात कोणत्याही सुविधा नसतानाही भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत आपले जीवन फुलविण्याचे काम तेथील ग्रामस्थ करत होते. कोयना धरणाच्या माध्यमातून मोडलेला संसार पुन्हा बहरत असतानाच पुन्हा एकदा त्यांच्या संसारावर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या रुपाने पुन्हा एकदा संकट कोसळले़आधी कोयना धरण, मग अभयारण्य अन् आता व्याघ्र प्रकल्प, यामुळे कोयना धरण परिसरातील लोकांवर पुन्हा एकदा विस्थापनाचं भूत मानगुटीवर बसलेलं आहे़ ज्यांनी या कोयना परिसरातील डोंगरदऱ्यांवरील झाडांवर प्रेम केले. आपल्या मुलाप्रमाणे त्यांचे संगोपनही केले, हे जगंल आपले आहे, या भावनेतून त्यांचे रक्षण केले तेच जंगल आता तेथील जनतेच्या मुळावर उठलेले आहे. कोयना धरणाच्या जखमा अजूनही ओल्याच असतानाच ‘कोअर आणि बफर झोन’च्या रुपात येथील लोकांच्या जखमांवर मीठ चोळताना दिसत आहे. कोयना धरणापासून तीन किलोमीटर अंतर असणाऱ्या हुंबरळी गावातील रमेश गणपत देसाई या व्यावसायिकासमोरील संकटामध्ये वाढ होताना दिसत आहे़ देसार्इंना कोयना धरणात गेलेल्या जमिनीच्या बदल्यात हुंबरळी येथे तीन एकर शेती देण्यात आली होती. या जमिनीतून नाचणी आणि भात हीच प्रमुख पिके घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते़ त्यांना शेती करताना वन्यप्राण्यांचा त्रासदेखील होत होता. त्यासाठी स्वत:कडे आणि गावातील लोकांनी वन्यप्राण्यांपासून स्वत:चे रक्षण व्हावे म्हणून बंदूक परवानेही काढले. त्यांनी कोयनेला लाभलेल्या निर्सगसंपन्नतेचा फायदा घेण्यासाठी पर्यटनाला चालना देण्यासाठी हॉटेल व्यवसाय सुरू केला; परंतु २०१२ पासून ‘कोअर आणि बफर झोन’ प्रकल्पापासून व्यवसाय अडचणीत आला़ यातच त्यांना किडनी विकाराने ग्रासले़ वडिलोपार्जित शेती विक्रीसाठी काढली तरी कोण विकत घेण्यासाठी तयार नाही़ बँकेकडे जमीन तारण ठेवून वैद्यकीय खर्चासाठी कर्ज काढायचे म्हटले तरी कर्ज बँक देत नाही, अशा अवस्थेत सापडलेले देसाई यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानकडून मदतीकरिता आवाहनही केले आहे़ परंतु त्यांना शासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही़ देसाई यांच्यासारखे अनेक कुटुंब या कोअर झोनमध्ये मरण यातना भोगत आहेत. कुणाच्या मुलांचे शिक्षण, लग्न ंिकंवा वैद्यकीय खर्च करणेही अवघड झाले आहे़ या अत्यंत जाचक अटी असतानाही या परिसरातील ग्रामस्थ शांतपणे आपले जीवन जगत असताना सर्वसामान्य जनतेला मरण यातना सोसाव्या लागत आहेत़ या कोयना परिसरातील कोअर झोनमधील शासन जमिनीचा दर खूपच कमी आहे़ सध्याचा रेडी रेकनर दर फारच कमी आहे़ त्यामुळे तेथील दर वाढवून मिळावेत़ शासनाकडून अध्यादेश निघाल्यापासून कोअर झोनमधील गावांमध्ये शासनाच्या वतीने कोणतेही रस्ता, पाणी, वीज व शाळा या माध्यमातून गेली पाच वर्षे विकासकामे झालेले नाही़ पर्यटन व्यवसायावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे़ त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून येथील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत होता, त्यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे़ तसेच शासनानेदेखील मानववस्तीचा भाग वगळून ज्याठिकाणी फक्त जंगल आहे, तेथील भाग वाघाकरिता आरक्षित गेला तर किमान त्यांच्या अडचणी तरी दूर होतील़ शासनाने अडचणी दूर कराव्यात...कोअर आणि बफर झोन मधील ग्रामस्थ गेली पाच वर्षे कॅशलेस जीवन जगत आहेत़ या परिसरातील लोकांना कॅशलेस जीवन जगताना अनेक अडचणी येत आहेत़ तर शासनाने त्वरित येथील ग्रामस्थांच्या कोअर झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणीमधून मुक्ती द्यावी, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे़
अनेक कुटुंबे पाच वर्षांपासून कॅशलेस
By admin | Published: February 15, 2017 10:41 PM