शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
3
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
4
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
5
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
6
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
7
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
8
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
9
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
10
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
11
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
12
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
13
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
14
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
15
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
16
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
17
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
18
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
19
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
20
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे

सातारा जिल्ह्यातील 'मान्याचीवाडी' बनले 'ग्रामविकासाचे अभ्यासकेंद्र', सांगलीच्या चाळीस गावच्या कारभाऱ्यांनी केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 12:54 PM

राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत

ढेबेवाडी : श्रमदान आणि लोकसहभागातून ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरलेले पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गाव आता ग्रामीण विकासाचे अभ्यासकेंद्र बनले आहे. राज्यासह परराज्यातील गावकारभाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांच्याही सहली या गावात येऊ लागल्या आहेत.सांगलीचे सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील चाळीस ग्रामपंचायतींंचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी ढेबेवाडीला भेट दिली.

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने पंचायत राज व्यवस्थेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांची भर घालत एका आयडीयल गावाची संकल्पना यशस्वी केली आहे. यामुळे येथे ग्रामीण विकासावर अभ्यास करणारे प्रशिक्षणार्थी, सिंबाॅयोसीसचे विद्यार्थी, यशदा पुणे येथे प्रशिक्षणासाठी असणारे विद्यार्थी, यासह राज्यासह परराज्यातूनही हजारो गावातील गावकारभाऱ्यांनी या गावाची अभ्यासासाठी निवड केली. येथे भेटी देऊन ग्रामविकासाचा अभ्यास केला आहे.

सांगलीचे सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विस्ताराधिकारी श्रीधर कुलकर्णी, विस्ताराधिकारी आर. एल. गुरव, विस्ताराधिकारी एस. डी. मगदूम, विस्ताराधिकारी मदन यादव यांच्यासह सुमारे चाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, डाटा ऑपरेटर आदिंनी मान्याचीवाडीमध्ये येऊन राबविलेल्या उपक्रमांची माहीती घेतली.

यामध्ये सौरग्राम, रुफटॉप वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्यावरील परसबागा, बंदिस्त गटर योजना, सीसीटीव्ही, वॉटर सायरन, बायोमेट्रिक ग्रामसभा, वृक्षलागवड, पक्षांची भोजनालये आदिंसह ग्रामपंचायतीच्या कारभाराची पाहणी करुन चर्चा केली. यावेळी सरपंच रवींद्र माने, विस्ताराधिकारी कुंभार, प्रसाद यादव, दादासाहेब माने यांनी माहिती दिली.

ग्रामीण विकासात मान्याचीवाडीसारख्या छोट्याशा गावाने खूपच मोठी झेप घेतली आहे. निश्चितच येथील उपक्रम प्रेरणादायी तसेच ग्रामविकासाला चालना देणारे आहेत. गावागावातील सरपंच आणि गावकारभाऱ्यांसह प्रशासनाने असे उपक्रम राबविल्यास ग्रामविकासाची चळवळ यशस्वी ठरेल.  - विशाल नरवाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी मिरज

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीRural Developmentग्रामीण विकास