शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

मराठा समाजाची २० जानेवारीला आरक्षण वारी, साताऱ्यातील साखळी उपोषण स्थगित

By दीपक देशमुख | Published: December 26, 2023 6:15 PM

पश्चिम महाराष्ट्रातून लाखो जण होणार सहभागी 

सातारा : आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ६३ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण तीन चिमुकल्यांच्या हस्ते सरबत घेवून स्थगीत करण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधव २० जानेवारीला पायी आरक्षण वारी काढणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ६३ दिवसांपासून जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. जरांगे-पाटील यांची राज्यस्तरीय मराठा क्रांती माेर्चाची राज्यस्तरीय बैठक झाली. यात झालेल्या निर्णयानुसार २० जानेवारीपर्यंत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर २० जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईत मराठा समाज गोळा होईल, असा अल्टिमेटम सरकारला दिला. तथापि, सातारा जिल्ह्यातील साखळी उपोषण सुरूच ठेवण्यात आले. परंतु, पोलीस प्रशासनाने २० जानेवारीपर्यंत निर्णय होण्याची प्रतीक्षा करावी व उपोषण सोडावे असे आवाहन केले. ही शिष्टाई सफल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन स्थगीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंंगळवारी तीन शाळकरी मुली यांच्या हस्ते सरबत घेवून आणि पोलिस अधिकारी प्रमुख उपस्थितीत उपोषणाची सांगता केली.यानंतर २० जानेवारीला पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या वतीने आरक्षण वारी काढण्यात येणार आहे. वारीच्या नियोजनाची लवकरच बैठक होणार आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून मराठा बांधव सातारा जिल्ह्यापर्यंत येतील. यानंतर जिल्ह्यातील मराठा युवक बांधव वारीत सहभागी होतील. वाटेतील सर्व गावातील मराठा बांधवांना सोबत घेवून वारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे शरद काटकर यांनी दिली.

आंदोलकांचे पोलिसांकडून कौतुकपोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी म्हणाले, पुढील महिन्यात आंदोलनाबाबत निर्णय होणार असून तोपर्यंत आंदोलन स्थगीत करावे, अशी विनंती मराठा समाजाबांधवांना केली होती. त्यास मान देवून साखळी उपोषण स्थगीत करण्यात आहे. मराठा समाजाने इतक्या दिवसांच्या उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्था होणार नाही, याची काळजी घेतली हे कौतुकास्पद आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षण