सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसतील. ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत २१0 सदस्य असणार आहेत. या समितीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे यांच्याकडे सूत्रे राहतील, अशी माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सकल मराठा समाजाने मुंबईवर मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळाला. लाखो मराठा बांधव रस्त्यावर उतरले होते. आता पुन्हा क्रांतिदिनी थेट मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. साहजिकच सर्व जिल्ह्यांमध्ये काढलेल्या मोर्चात सहभागी झालेले लाखो मराठा बांधव एकत्रितपणे मुंबईत धडकणार असल्याने मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा समावेश करुन २१0 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांची बाजू दस्तुरखुद्द कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सावरण्याचा प्रयत्न केला होता. उदयनराजेंच्या अटकेनंतर संपूर्ण राज्यभरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. उदयनराजेंच्या नेतृत्वाची व्याप्ती यानिमित्ताने पुढे आली. त्याला संभाजीराजेंचीही साथ मिळत आहे. आता राजकीय क्षेत्रातही हे दोघे राजे संयुक्तिकपणे मोहिमा काढताना पाहायला मिळू शकतील. |
मराठा मोर्चाचे नेतृत्व छत्रपतींकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:11 PM
सातारा : सकल मराठा समाजातर्फे क्रांतिदिनी (दि. ९ आॅगस्ट) मुंबई येथे काढण्यात येणाºया मोर्चाचे नेतृत्व साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे यांच्याकडे देण्यात आले आहे. आगामी काळात छत्रपतींच्या सातारा व कोल्हापूर या दोन गाद्यांचे वंशज यानिमित्ताने आक्रमकपणे वाटचाल करताना दिसतील.
ठळक मुद्देउदयनराजे- संभाजीराजेंच्या खांद्यावर दिली जबाबदारीमराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीची निवड संयोजक करण गायकर यांची माहितीदोघे राजे संयुक्तिकपणे मोहिमा काढणार