शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मराठा आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल- राजेश क्षीरसागर

By दीपक शिंदे | Published: October 22, 2023 5:04 PM

सातारा जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देणार

सातारा : सातारा जिल्हा रुग्णालयास लवकरच अचानक भेट देणार आहे. हवं तर स्कुटरवरून येवून पाहणी करेन. या रुग्णालयाचा टप्प्या-टप्प्याने विकास करण्याच्या अनुषंगाने आरोग्य उपसंचालकांसमवेत व्यापक बैठक घेवून जे-जे करावे लागेल, ते करू. जिल्हयातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. मुंबईत आझाद मैदानावर नियोजित शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी सातारा दौऱ्यावर आलेल्या राजेश क्षीरसागर यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

क्षीरसागर म्हणाले, दरवर्षी दसऱ्याला शिवतिर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी जायचो. गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्ही एकनाथ शिंदे यांच्या तोंडून ऐकण्यासाठी बी.के.सी. मैदानावर गेलो तर यावर्षी आझाद शिवसैनिकांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होत आहे. सातारा जिल्ह्यातून किमान दहा हजार शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. लोकांनी शिवतिर्थावर सोनिया गांधी, राहूल गांधी, ममता बॅनर्जी, मुलायमसिंग यांचे विचार ऐकायचे काय असा सवाल करत उद्ध ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टिका केली.

मराठा समाजाचा आरक्षण गंभीर विषय आहे. आरक्षण मिळावे, पण कायमचे टिकणारे असावे, यासाठी सरकार काम करत असून मराठा समाजाला आरक्षण एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारींबाबत क्षीरसागर म्हणाले, असे प्रकार आढळून आल्यास ताबडतोड तक्रार करावी. सर्वसामान्यांना त्रास झाल्यास कडक कारवाई करणार करणार असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत युतीच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यानंतरच साताराची जागा युतीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार लढवणार हे निश्चित होईल, असे क्षीरसागर म्हणाले. पाटील, महाडिक, मुश्रिफ एकत्र एकत्र आले तर..

कोल्हापुरातील एका कार्यक्रमात एकमेकांचे विरोधक असलेले सतेज पाटील, धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येवून फेटे बांधले याबाबत क्षीरसागर यांना छेडले असता ते म्हणाले, राजकारणात कोणी हाडवैर संपवून एकत्र येत असले तर आनंदच आहे. परंतु, ते तिघे एकत्र आले तरी शिवसेनेला काही फरक पडणार नाही. उलट शिवेसनेचाच जनाधार वाढेलच. कारण जनतेलाही त्यांचे खरे राजकारण कळून येईल.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार