फलटण : मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ६) फलटण येथे मराठा समाजाच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचे रुपांतर नंतर बैठकीत झाले.फलटण येथे काढण्यात आलेल्या भव्य-दिव्य रॅलीतून भगवे तुफान उठले. यामध्ये महिला, युवतींसह युवक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आला.फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी व छत्रपती संभाजीराजे यांचे आजोळ असल्याने मराठा बांधव या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी चार वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणातून रॅलीस सुरुवात झाली. क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डेक्कन चौक, महात्मा ज्योतीबा फुले चौक, गजानन चौक, शंकरमार्के ट, शुक्रवार पेठ, बारस्करगल्ली, मारवाड पेठ ते गिरवी नाका, सजाई गार्डन अशी रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोपझाल्यानंतर सजाई गार्डन येथे बैठक पार पडली.या बैठकीत सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथील मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. रॅलीमध्ये महिला व युवतींनी सहभाग नोंदवत भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान केले होते.एक लाख मोर्चेकºयांना मोफत जेवणमुंबईत ९ आॅगस्ट रोजी होणाºया मराठा क्रांती मोर्चात सातारा जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मुंबईत जाणाºया पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथील लाखो मराठा मोर्चेकºयांना वेळे (ता. वाई) येथील आराम हॉटेलचे मालक विजयराव यादव यांच्याकडून ८ व ९ आॅगस्ट रोजी दिवसभर नाष्टा व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये एका वेळेला २ हजार ५०० मोर्चेकरी जेवण करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे . दोन दिवस २४ तास जेवण व नाष्टा मोफत तसेच पाण्याचीही सोय करण्यात आले आहे. एक दिवस जातीसाठी म्हणून विजय राव यादव यांनी एक लाख मोर्चेकरी जेवण करतील, अशी व्यवस्था केली आहे. याच्या नियोजनासाठी २०० हून अधिक कर्मचारी सज्ज झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र घुमतोय ‘मराठा आवाज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 10:47 PM