फलटण : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शुक्रवारी फलटणमध्ये प्रबोधन मंच आणि राष्ट्रप्रेमी देशभक्त विविध संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. आंदोलनकर्त्यांना प्रांताधिकाºयांना निवेदन दिले.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात भाजपचे पदाधिकारी अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘भारत माता की जय..’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ आल्यानंतर प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप सामोरे गेले. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्थान, बांगलादेश येथील धार्मिक अत्याचारास कंटाळून भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्याक असणाºयांसाठी आहे. बाकीच्या देशातून आलेल्या नागरिकांना अकरा वर्षांत नागरिकत्व मिळते; परंतु या लोकांना पाच वर्षांत मिळणार आहे. सध्या भारतात राहणाºया कोणत्याही धर्मातील बांधवांना या कायद्याचा त्रास होणार नाही. काही अपप्रवृत्ती या कायद्याविरोधात माथी भडकावून दंगे घडवून आणत आहेत, अशा अपप्रवृत्तीविरोधात कारवाई व्हावी.
मोर्चात नगरसेवक अनुप शहा, सुशांत निंबाळकर, बजरंग गावडे, वि. रा. त्रिपुटे, रवींद्र फडतरे, राजेश हेंद्रे, उषा राऊत, माऊली सावंत, पोपट बर्गे, दामूअण्णा रणशिंग सहभागी झाले होते. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.