लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माणसा-माणसांमधून कटुता कमी करणारी अन् एकमेकांना ‘तीळगूळ घ्या गोड-गोड बोला’ असे म्हणून नातेसंबंध जोडणारी मकरसंक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी साताऱ्याची बाजारपेठ सज्ज झाली आहे. सणासाठी लागणारे वाण, तीळगूळ, रेवड्या, हळदी-कुंकू विक्रीसाठी आले आहेत. रविवारी सुटी असल्याने महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
फोटो१
संक्रांतीनिमित्त तीळगूळाबरोबर तिळाची चिक्की, लाडूलाही मोठी मागणी असते. साताऱ्यात रेवडी, तीळ, लाडू आदी प्रकार आले आहेत. साधारण २४० रुपये किलो दराने तीळाच्या वडीची विक्री होत आहे.
फोटो २
मकर संक्रांती सणाला सुगडीला आणखी महत्त्व असते. महिला या सुगडीची पूजा करीत असतात. सुगडी शहरातील विविध बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यंदा आकर्षक रंग आणि लेस लावलेल्या सुगड्या पहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांना विशेष मागणी होत आहे.
फोटो ३
हलव्याचे दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये महिलांचा सेट दोनशे ते सहाशे रुपये तर लहान मुलांचा कृष्णा सेट शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत उपलब्ध आहे. हलव्याचे दर शंभर रुपयांपासून उपलब्ध आहेत.