शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महिलांच्या ग्रामसभेत ‘मार्केटिंग’चा फंडा !

By admin | Published: January 26, 2015 12:42 AM

चाफळ येथील प्रकार : ग्रामपंचायतीनेच दिले दलालांना आवतण, जाब विचारणाऱ्या महिला सरपंचांचीच उलटतपासणी

चाफळ : येथील ग्रामपंचायतीची शनिवारी विशेष ग्रामसभा झाली. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत महिलांचे प्रश्न जाणून घेणे व त्यावर निर्णय घेणे अपेक्षित होते; पण ग्रामसभेत चक्क मार्केटिंगवाल्यांना आवतण दिलं गेलं. एका खासगी कंपनीच्या दलालाने ग्रामसभेत कंपनीविषयी माहिती देऊन ग्रामसभाच ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केला. महिला सरपंचांनी त्याबाबत विचारणा केली असता, दलालाने त्यांनाच दमबाजी केली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ ग्रामपंचायतीच्या वतीने येथील मारुती मंदिरात महिलांच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संध्याराणी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेस जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ, उपसरपंच अंकुश जमदाडे, ग्रामविकास अधिकारी सतीश माने, ग्रामपंचायत सदस्या अलका पाटील, अनिता चव्हाण, रेखा पवार, शोभा पाटील, सुनीता पवार, उज्ज्वला वाघमारे, कांचन शेटे, छाया गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी सतीश माने यांनी सभेच्या मूळ उद्देशाविषयी माहिती दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक एका नामवंत कंपनीचे तिघेजण एका आलिशान कारमधून त्याठिकाणी आले. शासकीय अधिकारी ग्रामसभेला आले असावेत, असा सर्वांचा समज झाला; पण ते तिघेजण एका खासगी कंपनीचे दलाल असल्याची माहिती काहीवेळातच ग्रामस्थांना मिळाली. ग्रामसभेत महिला बोलत असतानाच सरपंच पाटील यांची परवानगी घेऊन संबंधित तिघांपैकी एका दलालाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करीत भाषणास सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीपासूनच तो दलाल त्याच्या कंपनीची माहिती उपस्थितांना देऊ लागला. सर्व भाषणात त्याने फक्त त्याच्या कंपनीविषयीच महिलांना प्रबोधन केले. काहीही संबंध नसताना उपस्थितांना त्या कंपनीचा उदोउदो ऐकावा लागला.वास्तविक, महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष ग्रामसभेत महिलांना प्रश्न मांडायचे होते. मात्र, या मार्केटिंंगच्या फंड्यात सर्व काही राहून गेले. कंपनीच्या विषयावरच सभेचा शेवट झाल्याने महिलांना निराश होऊन तेथून परतावे लागले. ग्रामसभेत प्रश्न मांडता न आल्याने महिलांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकाराची जाणीव झाल्यानंतर सरपंच संध्याराणी पाटील यांनी संबंधित कंपनीच्या दलालांना धारेवर धरले. ‘तुम्ही आम्हाला अंधारात ठेवून व शासनाची योजना असल्याचे भासवून ग्रामसभेत बोलायला परवानगी मागितली होती. आमची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही जी माहिती दिली, ती शासकीय योजना नाही. तुम्ही खासगी कंपनीची माहिती ग्रामसभेत देऊन ग्रामपंचायती फसवणूक का केली,’ असा प्रश्न सरपंच पाटील यांनी विचारला. त्यावेळी संबंधित दलालाने ‘मी पाटण तालुक्यातील एका संघटनेचा संघटक असून याबाबत तुम्ही आमच्या साहेबांशी बोला,’ असे म्हणत सरपंचांचीच उलट तपासणी घेतली.चाफळसारख्या संवेदनशील ग्रामपंचायतीकडून असे प्रकार घडणार असतील तर इतर ग्रामपंचायतींनी काय आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंपन्यांकडून होणारी फसवणूक लक्षात घेता, दलालांपासून ग्रामपंचायतीने सावधगिरी बाळगणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीने चक्क ग्रामसभेतच कंपनीच्या दलालांना आवतण दिल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. जि. प. सदस्यांचा काढता पायचाफळ ग्रामपंचायतीत झालेला हा मार्केटिंगचा फंडा निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्य डी. बी. वेल्हाळ यांनी ग्रामसभेतून काढता पाय घेतला. ग्रामपंचायतीने शासनाचे नियम धाब्यावर बसवून चक्क एका खासगी कंपनीच्या मार्केटिंंगसाठी ग्रामसभेचा वापर केल्याने सभेचा मूळ उद्देशच बाजूला राहिला आहे.