कुडाळ : जावळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, तसेच कोरोनाचा वाढता धोका पाहता, मेढा शहर व जावळी तालुक्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेशही प्रशासनाने दिलेले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन पाळण्यात आला. घरी राहा, सुरक्षित राहा, असा संदेश सर्वांनी पाळला. ग्रामीण आणि बाजारपेठेच्या ठिकाणीही शुकशुकाट पाहायला मिळत होता. पोलिसांकडूनही ठिकठिकाणी तपासणी होत होती, तरीही कोरोनाबाबत कोणतीही काळजी न घेता, अनेक नागरिक सामान्य स्थितीत वावरतानाही दिसत आहेत. नागरिकांनी आपली काळजी घेण्याची गरज आहे.
जावळी तालुक्यातील आठवडा बाजारात असंख्य लोक येतात. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही. यासाठी मेढा शहरासह तालुक्यात सर्व ठिकाणी भरणारा आठवडा बाजारही आता बंद करण्यात आला आहे. याबाबत आदेशाचे उल्लंघन केल्यास तरतुदीनुसार कठोर कारवाई होणार आहे, असे सांगण्यात आले.
............................................................................................................................................................................