शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

मार्ली घाट हत्याकांड : दुसऱ्या गुन्ह्यातही कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:22 PM

जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये चौघांचे हत्याकांड करणाऱ्या योगेश निकम (वय ३८, रा. सोमर्डी-शेते, ता. जावळी) याला त्याच्या घराल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकार देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे योगेशच्या घरच्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकारपोलिसांनाच द्यावा लागणार वकील

सातारा : जावळी तालुक्यातील मार्ली घाटामध्ये चौघांचे हत्याकांड करणाऱ्या योगेश निकम (वय ३८, रा. सोमर्डी-शेते, ता. जावळी) याला त्याच्या घराल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी नकार देण्यात आला आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे घरातल्यांनी एकप्रकारे त्याच्यावर बहिष्कारच टाकला आहे. त्यामुळे आता पोलिसांनाच त्याला वकील द्यावा लागणार आहे.सांगली जिल्ह्यातील बामणोली दत्तनगर येथील तानाजी जाधव, मंदाकिनी जाधव या दाम्पत्यासह त्यांची मुले तुषार आणि विशाल या दोघांचा मार्ली घाटात निर्घृण खून झाला होता. या खूनप्रकरणी मेढा पोलिसांनी योगेश निकमला अटक केली. त्याच्यावर खुनाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आई-वडिलांच्या खुनात त्याला दोनवेळा पोलीस कोठडी वाढवून मिळाली. तर त्यांच्या मुलाच्या खूनप्रकरणात सध्या सोमवार, दि. १४ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी योगेशच्या वतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सुरूवातीला कोणी वकील मिळत नव्हते.

योगेशच्या घरातल्यांकडून न्यायालयीन लढ्यासाठी त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एका वकीलाने त्याचे वकीलपत्र घेतले आहे. मात्र, हे वकीलपत्र कायमस्वरूपी असेल की नाही, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. योगेशला वकील मिळाले नाहीत तर आम्हालाच त्याला वकील द्यावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसरSangliसांगली