शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

By admin | Published: February 18, 2016 11:13 PM

शहीद सुनील सूर्यवंशी : मस्करवाडी-कुकुडवाडमधील नागरिकांचा सवाल ; कर्नाटक शासनाला जमलं, महाराष्ट्राला का नाही

कुकुडवाड : मस्करवाडी (कुकुडवाड) येथील वीरजवान हुतात्मा सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. हुतात्मा सूर्यवंशी यांच्या देशप्रेमाला नतमस्तक होण्यासाठी प्रचंड जनशक्ती एकत्र झाली; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस घोषणा न झाल्याने शासनाची माया का बरं आटली? अशी संतप्त प्रतिक्रिया कुकुडवाड नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सियाचीन येथे हिमकडे कोसळून हुतात्मा झालेल्या वीरजवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी मस्करवाडीत आले. घडलेल्या घटनेनंतर पार्थिव प्रत्यक्षात गावी येण्याचा कालावधी व त्याद्वारे झालेले दु:ख कुटुंबीय व ग्रामस्थांसाठी पर्वताएवढे होते. अखेर वीरजवान सुनील यांचे पार्थिव गावी आले आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने सैन्य दलातील जवान तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मस्करवाडीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अंत्यविधी पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी आले अन् गेले. त्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा होईल, हे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री आले नाहीत आणि इतर अनेकजण आले आणि काही आर्थिक मदत जाहीर न करताच निघून गेले.वास्तविक पाहता सियाचीन येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या कर्नाटकचे सुपुत्र हणमंतअप्पा यांना सरकारने २५ लाख, एक भूखंड व कुटुंबातील एकाला शासनाची नोकरी देऊ केली. त्या तुलनेत हुतात्मा सुनीलच्या कुटुंबीयांच्या पदरात काय पडलं, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना कुकुडवाड येथे येण्यास जमले नसले तरी पालकमंत्र्यांनी तरी तशी घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे घडले नसल्याने कुटुंबीय व कुकुडवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)इतरांवर अक्षरश: घोषणांचा पाऊससिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागतात. देशासाठी प्राण बलीदान करणाऱ्या निदड्या छातीच्या सुनिल सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची मात्र शासनाकडून उपेक्षाच झाली. सियाचीनमध्ये शहीद झालेल्या इतर जवानांना आपआपल्या राज्याने आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीच घोषणा जाहीर केली नाही. सूर्यवंशी कुटुंबीय आता उघड्यावर पडले असताना शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या मदतीशीवाय हे कुटुंब दुख: झेलत आहे.