गोटेवाडी ता. लोकमत न्यूज नेटवर्क उंडाळे: गोटेवाडी तालुका कराड येथील प्रकाश कळंत्रे यांच्या घराला काल रविवारी रात्री सायंकाळी साडेसात वाजता भीषण आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आल्याने घरातील सर्व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
यामध्ये प्रकाश कळंत्रे यांचे घराचे प्रचंड नुकसान झाले,ही आग विजवण्यासाठी वेळीच अग्निशामक दल आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही,मात्र या आगी मुळे गोटेवाडी गावावर चिंतेचे सावट पसरले आहे.