तरडगाव : संत ज्ञानेश्वर माउलींच्या तरडगावमधील अंतर्गत पालखीमार्गाची पाहणी करून प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी पालखी मार्गात अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणाबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिल्यामुळे भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.तरडगाव येथे दरवर्षी माउलींची पालखी रथातून उतरवून ती खांद्यावर घेऊन ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. यादरम्यान, माउलींच्या पादुकांचे चार ठिकाणी पूजन केले जाते. त्यामुळे याठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत तीन वर्षांपूर्वी विविध गावांतील कामांसाठी निधी मंजूर होऊन बहुतांश कामे पूर्ण झाली. परंतु तरडगावातील पालखी मार्गाचे काम अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी तरडगाव बसस्थानक ते सावता मंदिरापर्यंतच्या रखडलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी सरपंच अतुल गायकवाड, तलाडी पी. जे. पिसे, पांडुरंग शिंदे यांनी अतिक्रमाणाबाबत माहिती दिली. पाहणीनंतर प्रांत जाधव यांनी तलाठी भिसे यांना अतिक्रमणधारकांची यादी तयार करून त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी डी. डी. धायगुडे, सदस्य राजेंद्र पवार, विठ्ठल गायकवाड, अशोक सुतार, अमोल गायकवाड, लक्ष्मण मदने, दीपक गायकवाड, धनंजय चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)
‘माउलीं’च्या पालखी मार्गातील अडथळे होणार दूर
By admin | Published: November 23, 2014 12:33 AM