जिंती : फलटण तालुक्यातील जिंती येथील द्बारकाबाई यशवंत जाधव यांचे २५ जून रोजी निधन झाले. त्यांचे दहावाचे कार्य नुकतेच झाले. यावेळी जाधव कुटुंबातील सदस्यांनी आईच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिंती येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. यामध्ये बकुळी, पिंपळाचे रोपण करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, दिवंगत द्वारकाबाई जाधव यांनी गावामध्ये कित्येक नामकरण समारंभात आपल्या सुंदर स्वरामध्ये पाळणे गायिले आहे. गावात कोणाच्याही घरी कार्यक्रम असल्यास हिरीरीने सहभाग घेणाऱ्या द्विारकाबाई यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चिात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा प्रदीप प्राथमिक शिक्षक आहे.राज्यातील कित्येक जिल्ह्यात दुष्काळाने होरपळून निघत आहेत. त्यातून सातारा जिल्हाही सुटलेला नाही. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर वृक्षारोपण करणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचा विचार पुढे आहे. त्यानुसार जाधव कुटुंबियांनी जिंती गावातील स्मशानभूमी परिसरात बकुळी, पिंपळाच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. यावेळी डॉक्टर साळुंखे, बाबुराव बोबडे, सदाशिव लोखंडे, योगेश जाधव, तुषार रणवरे, विकास बोबडे यांचे खूप मोठे सहकार्य लाभले.
दुष्काळाची गंभीर समस्या भेडसावत असतात. कडक उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन निसर्गाचा वारसा जतन करण्यासाठी वृक्षारोपणासारख्या ऊपक्रम करणे आवश्यक आहे.- प्रदीप जाधव