आदर्की : आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने मायभूमीत झालेला सत्कार ज्ञानदानाचे काम करत असताना आयुष्यातील सर्वात मोठी शाबासकीची थाप असल्याचे आदर्श शिक्षक रवींद्र सपकाळ यांनी सांगितले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सपकाळ यांना फलटण तालुका पंचायत समितीमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानिमित्त माळेवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व सावतानगर (आदर्की बुद्रुक) ग्रामस्थ व व्यवस्थापन समितीच्या मार्फत सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
या वेळी माळेवाडा शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष वसंत बोडके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा बोडके, कोऱ्हाळे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य दीपक बोडके, माळेवाडा शाळेचे मुख्याध्यापक भगवान खताळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
२६आदर्की
माळेवाडा (सावतानगर) येथे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रवींद्र सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वसंत बोडके, भगवान खताळ, राजेंद्र पवार उपस्थित होते.