लोणंद (सातारा) : लोणंद येथील मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या दहा किलोवॅट ट्रांसफार्मरने शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळी अकरा वाजून 40 मिनिटांनी स्फोट झाल्याने भिषण पेट घेतला असून आग विझविण्यासाठी फलटण व निरा येथील अग्निशामक दलाचे बंब मागविण्यात आले असून महावितरणचे अधिकारी वर्ग आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या ट्रान्सफॉर्मर मध्ये ७२ बॅरल ऑईल असल्याने आगीची तिव्रता भयंकर होती. उंचच उंच धुराचे लोट पहावयास मिळत होते.
यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून लोणंद व परिसराला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यावर औलंबुन असणाऱ्या खंडाळा, फलटण तालुक्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा मात्र किती काळ खंडित राहील हे सांगता येणार नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापारेषणचे अधिकारी धरमाळे साहेब व दळवी मॅडम व कर्मचारी वर्ग प्रयत्न करीत आहेत. सपोनी संतोष चौधरी यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.