शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

कऱ्हाडातील गुंडांच्या टोळीवर मोक्काची कारवाई

By संजय पाटील | Published: January 29, 2024 6:59 PM

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून प्रस्तावाला मान्यता

कऱ्हाड : खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईच्या प्रस्तावाला छाननी पश्चात मान्यता दिल्यानंतर सोमवारी आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्यात कलमवाढ करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोम्या उर्फ सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय ३१), रविराज शिवाजी पळसे (वय २७), आर्यन चंद्रकांत सूर्यवंशी (वय १९, तिघेही रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कऱ्हाड) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची येथील गुंड सोम्या उर्फ सोमनाथ हा ग्रामपंचायत सदस्य असून त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांनी परिसरात गत काही महिन्यांपासून दहशत निर्माण केली आहे. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी खंडणीसाठी एकावर प्राणघातक हल्ला केला. कोयता तसेच बियरची बाटली फोडून त्याद्वारे संबंधितावर वार केले. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना टोळीप्रमुख सोम्या उर्फ सोमनाथ सुर्यवंशी हा त्याच्यासह साथीदारांसोबत परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी संघटित गुन्हेगारी करीत असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, उपनिरीक्षक राजू डांगे, अंमलदार संजय देवकुळे, असिफ जमादार, सागर बर्गे, प्रवीण पवार, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांच्यासह पथकाने संबंधित टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार टोळीवर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMCOCA ACTमकोका कायदाKaradकराड