शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

घरासमोरच जेवण, पाण्याची केली सोय : कोरोनातही पक्षीजीवांची काळजी ! क-हाडात पक्षीप्रेमींचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 11:29 AM

क-हाड येथील उद्यानात अनेक प्रकारची वृक्षे फुलली आहेत. तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या छत्रपती शिवाजी उद्यानात परिसरात राहणाऱ्या लोकांनी माणुसकीतून पक्ष्यांसाठी अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना गारवा मिळत आहे. तर बुधवार पेठ येथील संतोष आंबवडे यांच्याकडून देखील

ठळक मुद्देआपल्या घरासमोरच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे मडके तसेच खाण्यासाठी ज्वारी ठेवली जात आहे.

संतोष गुरव ।क-हाड : उन्हाळा सुरू झाला की पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. मात्र, वाहतुकीच्या रहदारीमुळे त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. सध्या कोरोना व लॉकडाऊनमुळे संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे लोक आपल्या घरामध्ये बंदिस्त आहेत. तर पक्षी, प्राणी मुक्तपणे संचार करीत आहेत. मात्र, वाढत्या उष्माघातामुळे त्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे. अशा पक्षीजीवांना सिमेंटच्या जंगलात मात्र, माणुसकीचा आधार मिळू लागलाय. तो म्हणजे कºहाड शहरात शंभरहून अधिक कुटुंबांनी पक्ष्यांसाठी घर, अंगण तसेच गच्चीवर पिण्याच्या पाण्याची व खाण्याची सोय केलेली आहे.

क-हाड येथील उद्यानात अनेक प्रकारची वृक्षे फुलली आहेत. तसेच शिवाजी हाऊसिंग सोसायटीच्या छत्रपती शिवाजी उद्यानात परिसरात राहणाऱ्या लोकांनी माणुसकीतून पक्ष्यांसाठी अन्न तसेच पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात त्यांना गारवा मिळत आहे. तर बुधवार पेठ येथील संतोष आंबवडे यांच्याकडून देखील आपल्या घरासमोरच पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे मडके तसेच खाण्यासाठी ज्वारी ठेवली जात आहे.

क-हाड शहरात एकूण चार उद्याने आहेत. प्रीतिसंगमावरील स्वामीबाग, टाऊनहॉल येथील बाग, सुपरमार्केट येथील आदरणीय पी. डी. पाटील उद्यान आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील छत्रपती शिवाजी उद्यान होय. त्यामध्ये सध्या पक्षी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे. मात्र, या व्यतिरिक्त त्यांची कºहाड शहरातील काही कुटुंबांकडूनही खाण्यापिण्याची सोय केली जात आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य