सातारा : पूरग्रस्त बांधवांसाठी सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहरकडून विविध प्रकारची मदत माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपुर्द केली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला कोकणात व सातारा, सांगली, कोल्हापूर येथे महापूर येऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अनेकांचे संसार मोडून पडले, वाहून गेले यातून सावरण्यासाठी सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभर मदतीचा ओघ आजपर्यंत सुरू आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार व शहर पदाधिकारी यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत म्हणून लागणारी औषध अँटिबायोटिक्स लहान मुलांचे अँटिबायोटिक्स त्वचेला उद्भवणाऱ्या संसर्गाचे मलम, पॅरासिटॅमल तापाचे व जंताचे औषध, सॅनिटायझर मास्क हॅन्ड ग्लोज आदींचे संकलन करून माननीय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपुर्द केले या कार्यास डॉ. शैलेंद्र डुबल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळेस जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे, सातारा शहरातील पदाधिकारी सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, दिलीप सोडमिसे, शाखाध्यक्ष चैतन्य जोशी विभाग अध्यक्ष गणेश पवार, सागर पवार, अविनाश भोसले, संतोष सासवडकर, जावली तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, समीर गोळे, शुभम विधाते, सातारा तालुका अध्यक्ष सौरभ कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली शिंदे, महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसागर यांच्यासह अन्य पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. (वा. प्र.)
(फोटो आहे)