शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडू: साताऱ्यातील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:11 PM

सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त मराठा युवकांनी बैठकीत दिला.मराठा आरक्षणासाठी लढाई आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. त्या ...

सातारा : आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याची मागणी संतप्त युवक आणि माताभगिनींनी केल्यानंतर त्याला बैठकीत एकमुखी पाठिंबा देण्यात आला. बंदमध्ये अनुपस्थित राहणाºया लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीमही आम्ही हाती घेणार असल्याचा इशारा संतप्त मराठा युवकांनी बैठकीत दिला.मराठा आरक्षणासाठी लढाई आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’च्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सातारा येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीची बैठक साताºयात झाली. त्यामध्ये सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय तर घेण्यात आलाच त्याचबरोबर आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कायम राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले.जिल्हाभरातून मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. महामोर्चा आणि ठिय्या आंदोलना खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरेसवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मराठा आरक्षणाची लढाई आता थांबवायचीच नाही. काही झालेतरी ही लढाई आपल्याला यशस्वी करून दाखावयची आहे, असा निर्धार सातारा जिल्ह्यातील तरुणाईने केला आहे. बैठकीत असंख्य युवक आक्रमकपणे बोलत होते. सरकारने कशी फसवणूक केली, याचा प्रत्येकजण पाढा वाचत होता. ‘शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मुंबई मोर्चावेळी देण्यात आलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झालेली नाही. कोणत्याच सवलती मराठा समाजाला मिळत नाहीत. पन्नास टक्के शुल्क भरूनही प्रवेश मिळत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज मिळत नाही. त्यातच मेगा भरतीचा घाट घातला असून, त्यातूनही आपल्याला काहीच मिळणार नाही. मराठा आरक्षणासाठी आपली लढाई सुरू असताना सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मराठा समाजाची फसवणूक करण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून होत आहे. त्यामुळे आता आपल्याला करो या मरोची भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. ठिय्या आंदोलनात दररोज एक तालुका सहभागी होणार आहे.शाळा, महाविद्यालयेही राहणार बंदबुधवारी होणारा सातारा जिल्हा बंद कडकडीत होणार आहे. सातारा जिल्हा बंदची हाक महामोर्चावेळीच दिली जाणार आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, शाळा, महाविद्यालये, एसटी जीप, रिक्षा बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालयांसह सर्व संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, सातारा जिल्हा पोलीस दल व समन्वय समिती यांच्यात चर्चा होऊन सातारा जिल्ह्याची शांतता अबाधित ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.शांततेत बंद पाळण्याचे पोलिसांचे आवाहनसाताºयातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेत बंद पाळून मोर्चा काढावा. हिंसक कृत्य करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १७ उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, १५० कर्मचारी, ३ सीआरपीची पथके व ५० होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे.