शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

'कराडची अस्मिता' सभासदांनी जपली! सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत नेमके काय घडले?

By प्रमोद सुकरे | Updated: April 14, 2025 16:48 IST

घडतंय बिघडतंय : पण त्यांचे काय झाले? ज्यांनी काढली होती खपली

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराडसह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कराडच्या अस्मितेचा विषय चांगलाच गाजला.कराडची खासदारकी,आमदारकी गेली आता कारखाना तरी राखा असे भावनिक आवाहन सत्ताधाऱ्यांच्या प्रचारातून झाले. मतदारांनीही 'कराडची अस्मिता' जपली.सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पनेललाच पुन्हा संधी दिली.पण कारखान्याचा कारभार मत्त्यापूर मधून चालू देणार नाही अशी टिका करीत 'कराडची अस्मिता' जपण्याचे आवाहन करीत खपली काढणार्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या पनेलला कराड तालुक्यातील मतदारांनीच मोठ्या प्रमाणात नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

सह्याद्रीच्या निवडणूकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोज घोरपडे व ऍड.उदयसिंह पाटील यांचे एक तर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांचे दुसरे पनेल अशी तिरंगी लढत झाली.'दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ' याप्रमाणे सत्ताधारी बाळासाहेब पाटील गटानेच निकालात बाजी मारली. पण प्रचारात कराडच्या अस्मितेचा विषय सत्ताधाऱ्यांपेक्षा जास्त विरोधी निवास थोरात, रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलने लावून धरला होता.पण ही खपली काढणाऱ्या तिसऱ्या पॅनेलला कराड तालुक्यातील मतदारांनी नेमका कसा प्रतिसाद दिला? हे अंदाजे पाहणे महत्वाचे आहे. 

कराड दक्षिणमध्ये काय घडले..

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सह्याद्रीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावात ६,१४१ सभासद मतदार आहेत. पैकी ४८२४ मतदारांनी मतदान केले . त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला २,८४५,आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १,६२२ तर निवास थोरात यांच्या पनेलला अवघी ३०६ मते मिळाली आहेत. 

कराड उत्तर मध्ये काय घडले ..

 उत्तर विधानसभा मतदारसंघात असलेल्या कराड तालुक्यातील गावात सह्याद्रीचे १६,३४१ मतदार आहेत.पैकी १३ हजार ३४७ मतदारांनी मतदान केले. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ८,०११, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला ३,८४१, तर निवास थोरात व रामकृष्ण वेताळ यांच्या पनेलला अवघी १,३१६ मते मिळाली.

'कडेगाव'करांची 'बाळासाहेबां'चीच कड ..

कडेगाव तालुक्यात सह्याद्रीचे १,५७६ मतदार आहेत. पैकी १,३४२ मतदारांनी हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला १,०२१, आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला २६९ तर निवास थोरात यांच्या पनेलला ३५ मते पडली आहेत. 

सातारा तालुक्यात घोरपडे पुढे ..

कराड उत्तरेतील सातारा तालुक्यातील गावात१,५५९ सभासद मतदार आहेत. पैकी १२८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ५६७,आमदार मनोज घोरपडे यांच्या पनेलला ६८० तर निवास थोरात यांच्या पनेलला २८ मते मिळाली आहेत. 

 खटावात 'धैर्यशीलां'चे 'कदम' मागे ..

खटाव तालुक्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद मतदार संघात १,१०१ सभासद मतदार आहेत. पैकी ८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटलांच्या पनेलला ५६६, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला २४२ तर निवास थोरात व भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्या पनेलला ९६ मते मिळाली. धैर्यशील कदम यांचा मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो.पण त्यांना येथे अपेक्षित मते घेता आलेली नाहीत.याशिवाय उत्तर विधानसभा मतदारसंघात नसणार्या खटाव तालुक्यातील अन्य गावात सह्याद्रीचे ६७४ सभासद मतदार आहेत. पैकी ५०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला ३१५, आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १३६ तर निवास थोरात यांच्या तिसऱ्या पनेलला ४५ मते मिळाली.

 कोरेगावात ज्येष्ठ नेत्यांची जादू दिसली नाही ..

कोरेगाव तालुक्यात सह्याद्री कारखान्याचे ४,८१३ सभासद आहेत. पैकी ३,९१६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पनेलला २२७५ मते मिळाली.आमदार मनोज घोरपडेंच्या पनेलला १,१८१ मते तर निवास थोरात यांच्या पनेलला ४४४ मते मिळाली. निवास थोरात यांच्या पनेलला या भागातील ज्येष्ठ नेते भीमराव पाटील व संपतराव माने यांचा पाठिंबा होता. मात्र त्यांची जादू मताच्या रुपाने दिसली नाही अशी चर्चा आहे. 

 

टॅग्स :Karadकराड