कोल्हापूर : कोल्हापूरबाबत आकर्षण असणारे माजी राष्ट्रपती व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणी मंगळवारी कोल्हापुरातील मान्यवरांनी प्रतिक्रियांतून मांडल्या. त्यातून डॉ. कलाम यांनी ‘वारणा पॅटर्न’चे केलेले कौतुक, स्टेम सेल संशोधनाला दिलेले प्रोत्साहन आणि त्यांच्या अनुवादित केलेल्या पुस्तकांतून झालेला विचारांचा प्रसार, आदी आठवणींना उजाळा मिळाला.कोल्हापुरात २७ फेब्रुवारी २०१० रोजी भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी डॉ. सतीश पत्की यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेजारी डावीकडून तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी दयानंद कांबळे, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते.
‘मिसाईल मॅन’च्या आठवणींना उजाळा
By admin | Published: July 28, 2015 11:43 PM