शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पुरुषांचा वनवास संपला!

By admin | Published: July 11, 2014 12:20 AM

सातारा पालिका : पाच वर्षांनंतर मिळाली नगराध्यक्षपदाची संधी!

सातारा : सुमारे पाच वर्षांच्या कालावधीनंतर सचिन सारस यांच्या रूपाने सातारा पालिकेचे नगराध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे आले आहे. गेल्या पाच वर्षांत या पदावर महिलांनी अधिराज्य गाजविले. पुरुषांना या पदावर संधी देण्याच्या उद्देशानेच सारसांची नगराध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यानिमित्ताने पुरुषांचा पाच वर्षांचा वनवास मात्र संपला आहे.पालिकेचे नगराध्यक्षपद गेल्या पाच वर्षांपासून महिलांसाठी राखीव होते. गेल्या पंचवार्षिकमध्ये अखेरचे अडीच वर्षे इतर मागास प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी हे पद राखीव होते. तर चालू पंचवार्षिकमध्ये पहिले अडीच वर्षे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे पद राखीव राहिले. दोन्ही आघाड्यांनी महिलांना या पदावर संधी दिली. महिलांना आरक्षण नसेल तरीही नगराध्यक्षपद मिळून जाते. त्यामुळे पुरुषांना महत्त्वाची पदे कधी मिळणार हाच प्रश्न उपस्थित होतो. राजकारणात काम करणाऱ्या व भविष्यात चांगल्या पदाची इच्छा बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुत्सद्देगिरीलाच यामुळे खो बसतो.यापुढील अडीच वर्षांत अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपद राखीव झाले आहे. या पदासाठी हेमा तपासे इच्छुक होत्या. त्यांना पद दिले असते, तर पुरुषांना संधीच मिळणे कठीण होऊन बसले असते. तपासेंनी आटापिटा करून जातपडताळणीचा दाखला मिळविला. मात्र, अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या जागेवरून निवडून आलेल्या सारस यांच्यावर अन्याय झाला असता. या भावनेनेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तपासे यांच्याऐवजी सारस यांना संधी दिली. सारस यांच्या रूपाने पाच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुरुषांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. (प्रतिनिधी)