शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

पुरुषांत सातारा, महिलांत कोल्हापूर अजिंक्य

By admin | Published: November 29, 2015 11:18 PM

खेळाडू खाकी : त्रेचाळीसाव्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

सातारा : त्रेचाळीसाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये साताऱ्याच्या पुरुषांच्या संघाने तर महिलांमध्ये कोल्हापूरच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दरम्यान, पोलीस बँडच्या तालावर खेळाडूंचे संचलन, हवेत सोडलेले रंगबिरंगी फुगे आणि आकर्षक आतषबाजीने या स्पर्धांचा दिमाखदार समारोप येथील पोलीस कवायत मैदानावर रविवारी झाला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्या हस्ते विजेत्या संघांना ढाल प्रदान करण्यात आली. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, सांगलीचे अधीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीणचे प्रभारी अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, निवृत्त पोलीस आयुक्त डी. एन. जाधव, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक वीरेश प्रभू, यजमान साताऱ्याचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. पुरुषांचे क्रीडाप्रकार आणि विजेते संघ पुढीलप्रमाणे : पुरुष फुटबॉल विजेता कोल्हापूर, हॉकी कोल्हापूर, बास्केटबॉल सोलापूर आयुक्तालय, हँडबॉल सोलापूर आयुक्तालय, खो-खो सांगली, कबड्डी पुणे ग्रामीण, ज्युदो सातारा, कुस्ती सांगली, वेटलिफ्टिंग सातारा, बॉक्सिंग सातारा, जलतरण सातारा, अ‍ॅथलेटिक्स सांगली, क्रॉसकंट्री कोल्हापूर.महिलांचे क्रीडाप्रकार आणि विजेते संघ पुढीलप्रमाणे : व्हॉलिबॉल कोल्हापूर, बास्केटबॉल कोल्हापूर, कबड्डी सांगली, ज्युदो सातारा, कुस्ती सातारा, वेटलिफ्टिंग सातारा, बॉक्सिंग सातारा, क्रॉसकंट्री कोल्हापूर, अ‍ॅथलेटिक्स सांगली. बेस्ट अ‍ॅथलीट म्हणून कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटील व युवराज गुरबे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)एसपींनी धरला ठेकाकार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीम पथक तसेच पंकज डान्स अ‍ॅकॅडमीच्या मुलामुलींनी गणेश वंदना सादर केली. संचलन आणि बक्षिस वितरणानंतर शिंगतुताऱ्या आणि हलग्यांच्या तालावर विजेत्या संघातील खेळाडूंनी नृत्य केले. यावेळी आग्रहाखातर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही ठेका धरला.पुढील स्पर्धा सोलापूरलामावळत्या सूर्याच्या साक्षीने, बिगुलाच्या ध्वनिलहरीच्या पार्श्वभूमीवर पोलीस क्रीडा स्पर्धांचा ध्वज उतरविण्यात आला. पुढील स्पर्धांचे यजमानपद सोलापूर ग्रामीणकडे असून त्या संघाकडे हा ध्वज हस्तांतरित करण्यात आला.