शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

संतोषचे मानसिक संतुलन ढासळले !

By admin | Published: March 24, 2017 11:34 PM

वाई हत्याकांड; कोल्हापुरात उपचार सुरू

सातारा : संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडणाऱ्या वाई येथील सहा हत्याकांडातील आरोपी संतोष पोळ याचे मानसिक संतुलन ढासळले असून, त्याच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती शुक्रवारी सुनावणीदरम्यान पोळ याच्या वकिलांनी न्यायालयात दिली. तर दुसरीकडे सर्व सहाही खून खटले एकत्रच चालविण्यात यावेत, असा अर्ज सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला आहे.वाई येथील बहुचर्चित सहा हत्याकांडाची सुनावणी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात होती. यावेळी सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या वतीने दुसऱ्या सरकारी वकिलांनी न्यायालयात विनंती अर्ज सादर केला. सध्या न्यायालयात सहापैकी तीन खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. संतोष पोळने सहाही खून केल्याची माहिती ज्योती मांढरेला दिली होती. त्यामुळे सहाही खून खटले एकत्रित चालविण्यात यावेत, सरकार पक्षाला वारंवार पुरावा सादर करावा लागणार नाही, असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे.सुनावणीदरम्यान संतोष पोळला न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. पोळचे वकील अ‍ॅड. श्रीकांत हुडगीकर यांनी न्यायालयात त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून संतोष पोळचे वजन खूपच कमी झाले आहे. तसेच त्याला अशक्तपणा आला असून, त्याची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे त्याच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या दोन्ही अर्जांचे न्यायालयाने अवलोकन केल्यानंतर सुनावणीची पुढील तारीख दि. १३ एप्रिल नेमण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. (प्रतिनिधी)