पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात महिला सबलीकरण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी किशोरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या, तर अध्यक्षस्थानी सुषमा पाटील होत्या. डॉ. हेमलता काटे व डॉ. एस.डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सीमा चव्हाण म्हणाल्या, महिला व मुलींनी करिअर निवडताना त्याची योग्य माहिती घ्यावी. शारीरिकदृष्ट्या प्रत्येकीने खंबीर असायला हवे. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्याही आपण सक्षम असणे गरजेचे आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यामुळे स्वत:ला कमकुवत न समजता आपण सबला आहोत, हे मनात बिंबवणे आवश्यक आहे.
रूपाली भिंगार्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.
फोटो : ०४केआरडी०४
कॅप्शन : पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयात आयोजित किशोरी मेळाव्यात डॉ. सीमा जाधव यांनी मार्गदर्शन केले.