कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेने शहरात रविवारी काढलेल्या प्लास्टिक व थर्माकॉल वापर बंदीच्या जनजागृती रॅली सार्थकी ठरत असल्याचे दिसत आहे. कारण पालिकेच्या या आवाहनाला आता नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी शहरातील दोन व्यापाऱ्यांनी आपल्याकडील प्लास्टिक पिशव्या व सजावटीचे थर्माकॉल पालिकेत येऊन जमा केले.पालिकेत सोमवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीपूर्वी आशिष खेडेकर व देवरूखकर या दोन व्यापाऱ्यांनी थर्माकॉलचे सजावटीचे साहित्य तसेच प्लास्टिक पालिकेत स्वत:हून येऊन जमा केल्या. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती प्रियंका यादव, नगरसेविका शारदा जाधव, विद्या पावसकर, आशा मुळे, नगरसेवक अतुल शिंदे, संजय शिखरे, ‘एनव्हायरो’चे अध्यक्ष जालिंंदर काशीद आदी उपस्थित होते.कापडी पिशव्यांच्याखरेदीकडे व्यापाऱ्यांचा कल...कऱ्हाडकर नागरिकांनी सध्या प्लास्टिक पिशव्या वापर टाळण्यास सुरुवात केली असल्याने शहरात काही सामाजिक संस्थांच्या वतीने कापडी पिशव्या शिवण्याचे व त्यांची विक्री करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये महिला बचत गटांचेही सहकार्य लाभत आहे. या बचतगटांकडून हजारो कापडी पिशव्या तयार केल्या जात आहेत. त्याची खरेदी करण्यास सध्या शहरातील व्यापारी, दुकानदारांनी सुरुवात केली आहे.सोशल मीडियावरून नागरिकांना आवाहनकºहाड शहरात अनेक सोशल मीडियावर व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे नागरिकांना युवा वर्गातूनही प्लास्टिक पिशव्या वापर टाळण्याचे आवाहन केले जात आहे. प्लास्टिक पिशव्या, कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी ग्रुपद्वारे युवक-युवतीही चर्चा करताना पाहायला मिळत आहे.
व्यापाऱ्यांकडूून थर्माकॉल जमा कऱ्हाडकर सरसावले -: पालिकेच्या प्लास्टिकबंदी मोहिमेला साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:36 PM