शहरं
Join us  
Trending Stories
1
"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
2
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
3
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
4
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
5
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
6
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
7
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
8
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
9
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
10
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
11
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
12
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
13
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
14
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
15
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
16
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
17
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
18
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
19
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
20
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

जिल्हा काकडला; सातारा १२, महाबळेश्वर ११.८ अंशांवर; ग्रामीण भाग गारठला; शेतीच्या कामांवर परिणाम 

By नितीन काळेल | Published: November 28, 2024 12:02 AM

जिल्ह्यात नोव्हेेंबर महिन्याच्या प्रारंभी थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला किमान तापमान २० अंशादरम्यान होते...

सातारा : जिल्ह्याचा पारा आणखी घसरला असून, बुधवारी सातारा शहरात १२, तर महाबळेश्वरला ११.८ अंशाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. ग्रामीण भाग गारठला असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम झाला आहे.

जिल्ह्यात नोव्हेेंबर महिन्याच्या प्रारंभी थंडीला सुरुवात झाली. सुरुवातीला किमान तापमान २० अंशादरम्यान होते. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या सुमारास थंडी जाणवत होती. दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता होती. पण, मागील १० दिवसांपासून किमान तापमानात सतत उतार येत चालला आहे. सहा दिवसांपासून जिल्ह्याचा पारा कायम १५ अंशाच्या खालीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतोय. यामुळे जनजीवनावर चांगलाच परिणाम जाणवू लागला आहे.

सातारा शहरात मंगळवारी १२.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पण, एकाच दिवसात पारा जवळपास एक अंशाने घसरला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास शहराचे किमान तापमान १२ अंश नोंद झाले. यामुळे सकाळच्या सुमारास थंडीची लाट जाणवली. तसेच शीतलहरही असल्याने नागरिकांना हुडहुडी भरून येत होती. परिणामी सकाळी फिरण्यास जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वरचा पारा घसरला आहे. यामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाल्याचे जाणवते. सायंकाळी थंडीच्या वेळी पर्यटकांची संख्या तुरळक प्रमाणात दिसून येत आहे.जिल्ह्याचा पारा घसरल्याने ग्रामीण भागातही थंडीची लाट आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरीवर्ग दुपारच्या सुमारास शेतीची कामे उरकत आहे. तसेच शहरातील बाजारपेठेतही सायंकाळच्या सुमारास गर्दी जाणवत नाही. थंडीची तीव्रता पाहता आणखी काही दिवस गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सातारा शहरातील किमान तापमान असे :दि. १८ नोव्हेंबर १६.८, १९ नोव्हेंबर १४.७, २० नोव्हेंबर १४.५, २१ नोव्हेंबर १३.६, २२ नोव्हेंबर १३.७,२३ नोव्हेंबर १४.२, २४ नोव्हेंबर १४.५, २५ नोव्हेंबर १३.८, २६ नोव्हेंबर १२.९ आणि २७ नोव्हेंबर १२.

महाबळेश्वरला आठवड्यापासून १२ ते १३ अंशादरम्यान पारा -महाबळेश्वर शहरात मागील आठवड्यापासून १२ ते १३ अंशादरम्यान किमान तापमान आहे. त्यामुळे महाबळेश्वरची थंडी कायम असल्याचे दिसून येत आहे. महाबळेश्वरला मंगळवारी किमान तापमान १२.६ अंश होते, तर बुधवारी घसरून ११.८ अंशावर आले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान