मसूर : रिसवड (ता. कऱ्हाड) येथील विद्यार्थ्यांनी अभ्यास करून गावाचा लौकिक वाढवावा, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी, बारावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, मंथन परीक्षा अशा विविध परीक्षांत क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी पोस्ट खात्यातून निवृत्त झालेले गावातील तानाजी इंगवले व अंगणवाडी सेविका सत्त्वशीला बाळकृष्ण इंगवले या दोघांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश इंगवले यांनी केले. संतोष इंगवले यांनी आभार मानले.
या वेळी गावातील गुणवंत विद्यार्थी, जय भवानी दूध डेअरीचे संचालक उत्तम इंगवले, अण्णा वाघमारे, दादा महादेव इंगवले, माजी सरपंच संतोष इंगवले, तानाजी बाळू इंगवले, हणमंत इंगवले (पाटील), पांडुरंग इंगवले, दत्तात्रय माळी, पांडुरंग झंजे, दत्तात्रय भोसले, कैलास कांबळे, शिवाजी इंगवले, वैभव इंगवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो कॅप्शन- रिसवड येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी संपतराव इंगवले, संतोष इंगवले व उपस्थित मान्यवर.