शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

‘पदवीधर’साठी ‘मायक्रोप्लॅनिंग’ : कऱ्हाडातील दोन नेते भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:44 AM

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी

ठळक मुद्देराष्ट्रवादी, भाजपकडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम

सागर गुजर।सातारा : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी राष्ट्रवादी व भाजपने मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मायक्रोप्लॅनिंग केले आहे.

राष्ट्रवादीकडून सारंग पाटील तर भाजपकडून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे दोघे संभाव्य उमेदवार मानले जातात. दोन्ही नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे पदवीधर मतदार संघात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत.

या पाचही जिल्ह्यांमध्ये इच्छुकांचे दौरे सुरू आहेत.या मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खात्याचे मंत्रिपद दिले आहे. पाटील यांची मुदत जुलै २०१९ मध्ये संपत आहे. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणारी आहे. चंद्रकांत पाटील हे सलग दोनवेळा या मतदार संघातून निवडून गेले आहेत. मागील निवडणूक २०१४ मध्ये झाली. भाजपचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे सारंग पाटील व राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीची मते फुटल्याने सारंग पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सत्तेत असताना राष्ट्रवादीला बंडखोरी रोखता आली नव्हती, आता सत्तेबाहेर असणारी राष्ट्रवादी या निवडणुकीत एकसंध राहणार का? पुन्हा बंडखोरीचे वादळ घुमणार? यावरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जय-पराजय अवलंबून ठरणार आहे.

दरम्यान, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे. साताºयात नुकताच युवक राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा झाला. या मेळाव्यात पाटील यांनी हजेरी लावून एकसंध राहण्याचे आवाहन केले. दुसऱ्या बाजूला सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनीही कºहाड तालुक्यात मतदान नोंदणीवर भर दिला आहे.पतसंस्थांवरही टार्गेटसाताºयासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये पतसंस्थेचे मोठे जाळे आहे. या पतसंस्थांतील कर्मचाºयांना मतदार नोंदणीचे टार्गेट पक्ष नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे पतसंस्थेतील व्यवहारांसोबतच ‘ग्रॅज्युएट’ युवक-युवतींच्या मतदार नोंदणीचे कामही कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे.

चंद्रकांत पाटील लढणार सार्वत्रिक निवडणूकमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पक्ष ज्या ठिकाणी तिकीट देईल, तिथून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अशी करता येईल नोंदणीया निवडणुकीसाठी मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू व्हायला कालावधी असला तरी २०१९ पूर्वी दोन वर्षे पदवी धारण केलेल्या युवक-युवतींना मतदार नोंदणी करता येऊ शकेल. युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, ओळखपत्र व मतदार नोंदणीचा फॉर्म भरून तो तहसीलदार कार्यालयात जमा करून मतदार नोंदणी करता येणार आहे.