सातारा : कोयनानगर परिसरात शनिवारी रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता. येथे आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला आहे.पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात भूकंपाचे वारंवार धक्के जाणवत असतात. सोमवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी २.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. कोयना परिसरातच हा अतिसौम्य प्रकारातील धक्का जाणवला.
या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनापासून १४.४ किलोमीटर तर पाटण तालुक्यातील काडोली गावच्या अग्नेयेस ६ किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली ५ किलोमीटर होती. त्यानंतर शनिवारी रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी २.८ रिस्टर स्केलचा भूकंप झाला.हा धक्का कोयना तसेच पाटण परिसरात जाणवला. अतिसौम्य प्रकारातील हा धक्का होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून वीस किलोमीटर अंतरावर वारणा खोºयातील जावळे गावच्या पश्चिमेला सात किलोमीटर अंतरावर होता. त्याची खोली ८ किलोमीटर होती. दरम्यान, कोयना परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असतात.