शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मसूर येथे भिशीतून लाखोंचा गंडा

By admin | Published: December 06, 2015 12:02 AM

पोलीस अधीक्षकांकडे धाव : मारहाणीच्या, अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या धमक्यांमुळे दहशत

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील मसूरमध्ये भिशीच्या माध्यमातून अनेकांना लाखोंचा गंडा घातला गेल्याचे प्रकरण उजेडात आले असून, अशा लोकांकडूनच फसवणूक झालेल्या ग्रामस्थांना चौकात मारण्याच्या, अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्यामुळे त्यांच्यात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना शनिवारी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भिशीच्या माध्यमातून मसूर व परिसरातील जनतेची आर्थिक फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यासंबंधी मसूरमधील किशोर मेघराज शहा यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली होती. मात्र, यावर अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक गुन्हे उघडकीस येतील, असे शहा यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या आरोपींच्या धमक्यांमुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी) भर चौकात मारण्याची धमकी मसूर येथील गणेश मारुती शिवदास, इम्तियाज (इमाम) गफार मुल्ला, कालगाव, ता. कऱ्हाड येथील प्रवीण नानासो पवार या तिघांनी मिळून मसूर येथे पाच वर्षांपूर्वी भिशी सुरू केली होती. त्यात ४५ सदस्य होते. त्यामध्ये आपणास सदस्य करून घेतले होते. दरमहा दोन हजार रुपयांप्रमाणे नियमित हप्ते भरून आपले ९० हजार रुपये झाले होते; परंतु या त्रिकुटाने सतत बनवाबनवी करत आपणास त्यापैकी केवळ ३५ हजार रुपये परत केले. त्यानंतर त्यांनी दरमहा पाच हजार हप्त्याची दुसरी भिशी सुरू केली. पहिले राहिलेले ५५ हजार (११ हप्ते) आपण यामध्ये जमा करतो. बाकी सात हप्ते भरा, असे त्यांनी सांगितले. पहिले पैसे अडकल्यामुळे नाइलाजास्तव आपण दरमहा पाच हजारांप्रमाणे पुढील सात हप्ते भरले. असे ९० हजार रुपये त्यांच्याकडे अडकले असून, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘चौकात मार खायचा आहे का? पैसे मागितल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी दिली जात आहे.