शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पाचटापासून मिळणार लाखोंचे सेंद्रिय खत!

By admin | Published: December 07, 2015 10:24 PM

साबळे यांचा वाडे परिसरात प्रयोग :

रासायनिक खते अन् पाण्याच्या अतिरेकी वापराने कमी होणारा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्नशेतकऱ्यांसाठी कोट्यवधीचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा विशेष ओढा आहे. चांगले उत्पन्न मिळावे म्हणून भरमसाठ रासायनिक खताची मात्रा व पाणी दिले जाते. यामुळे जमिनीचा पोत कमी होतो याकडेमात्र दुर्लक्ष केले जाते. कमी खर्चात अन् नैसर्गिक पद्धतीने उसाचे उत्पादन मिळविण्यासाठी उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रयोग राबविला जाऊ लागला आहे. पाण्याच्या अती वापरामुळे जमिनीचा पोत कमी होत असून, उत्पन्न घटत चालले आहे. तीस वर्षांपासून शेतकरी उसाचे पाचट जाळत आले आहेत. जमिनीचा सामू ८.५० च्या वर गेला आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर ऊस पिकाखालील जमीन क्षारपड होण्याचा धोका कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शेतीच्या संदर्भात सातारा तालुक्यातील वाढेचे कृषी सहायक अधिकारी आर. एस. साबळे यांनी काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचा प्रयोग करत आहेत. शेतकरी आजवर उसाचे पाचट जाळत आले आहेत. त्यांनी पाचटाकडे विशेष लक्षच दिलेले नाही. याचा विचार करून साबळे यांनी पाचटाचे अर्थकारण केले आहे. यामध्ये वाढे गावात २५० एकर उसाचे क्षेत्र आहे. त्यातून दरवर्षी एक हजार टन पाचट मिळते. बाजार पेठेत सेंद्रिय खताचा दर प्रती टन चार हजार असल्याने या पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास चाळीस लाख रुपये किमतीचे सेंद्रिय खत तयार करू शकतो असा त्याचा दावा आहे. याप्रमाणेच खेड येथे दोनशे एकर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यातून आठशे टन पाचट मिळत आहे. यापासून सेंद्रिय खत तयार केल्यास ३२ लाखांचे सेंद्रिय खत तयार करता येऊ शकते. संगम माहुली येथे शंभर एकर क्षेत्रात उसाचे उत्पादन घेतले जाते. तेथेही चारशे टन पाचट तयार होते. त्यातून सोळा लाखांचा सेंद्रिय खत जाळत आहे. हे टाळण्यासाठी साबळे हे जनजागृती करत आहेत.सर्व सरी पाचट पद्धती : या पद्धतीमध्ये सर्व सऱ्यांमध्ये पाचट ठेवून उसाचे खुंट उघडे केले जातात व सरीत जेथून पाणी दिले जाते तेथील ५ ते ६ फूट अंतरावरील पाचट काढले जाते व खते दान हप्त्यात पहारीने दिली जातात. कोणत्याही परिस्थितीत खते फेकून देऊ नयेत. सरी आड सरी पाचट पद्धत : या पद्धतीमध्ये सरी आड सरी पाचट दाबले जाते व जी सरी मोकळी होते त्या सरीतून खते व पाणी देता येतात. दोन मजूर एका दिवसात एक एकराची दाताळ्याने सरी आड सरी/पाचट करु शकतात. ज्यावेळी ऊस तोडीच्या वाहनामुळे सरी वरंबा सपाट झालेले असतात व पाणी देण्याची अडचण होते. अशा वेळी या पद्धतीचा वापर करावा.उसाच्या पट्ट्यात पाचट कुजविणे : या पद्धतीमध्ये २:१ या पद्धतीने उसाची लागवड केलेली असते व पट्ट्यात पाचट दाबले जाते आणि मोकळ्या सरीतून खते व पाणी देता येतात. यांत्रिक पद्धत : या पद्धतीमध्ये सर्व पाचट शेतातच ट्रॅक्टरला जोडलेल्या औजारांच्या साह्याने बारीक केले जाते व नंतर वापरले जाते. खड्डा पद्धत : या पद्धतीमध्ये सर्व पाचट प्लॉटच्या बाहेर काढून खड्ड्यात टाकून कुजविले जाते व नंतर वापरले जाते.उसाचे पाचट हे ऊस शेतीला वरदान असून, गेली ५ वर्षे मी ४ एकरामध्ये पाचट न जाळण्याचा प्रयोग केला आहे. याच्यातून कमीत कमी भांगलण, पाणी व खत यांच्यावरील खर्चात ६० टक्के व ७० टक्के बचत झाली आहे. खर्चाचे पर्यायाने फायद्यात रुपांतर झाले आहे. एवढेच नव्हेतर सातत्याने प्रयोग केल्यामुळे माझी शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती झाली आहे. - जगन्नाथ मुगुटराव नलावडे, वाढेजगदीश कोष्टी