खटाव : शाळेत सायकलवरून जात असताना एका अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात ओढत नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पीडित मुलगी तेरा वर्षांची असून,शाळेला सायकलवरून जात होती. यावेळी तेथे २४ वर्षीय तरुण आला. त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने तिचा आवाज ऐकून रस्त्यावरून गाडीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या मदतीसाठी धाव घेतली. संशयित २४ वर्षीय तरुण हा उसाच्या शेतात पळून गेला. या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाली होती.काही युवक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पुसेगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस ही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी उसाच्या शेतात लपलेल्या तरुणाला शोधून काढून पकडले. पीडित मुलीच्या आईने पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणावर विनयभंग व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुधाकर भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
Crime News Satara: शाळेत जाताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग, एकजण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 6:41 PM