शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

मिशन लसीकरण; कऱ्हाड ५८ हजारांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:36 AM

कऱ्हाड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणालाही वेग आला आहे. कऱ्हाड तालुक्यात आरोग्य विभागाने त्यासाठी अचूक नियोजन केले ...

कऱ्हाड : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणालाही वेग आला आहे. कऱ्हाड तालुक्यात आरोग्य विभागाने त्यासाठी अचूक नियोजन केले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांसह शहरातील नागरी आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयांत टप्प्याटप्प्याने लसीकरण होत आहे. आजअखेर ५८ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून, नावनोंदणीची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार ४०० झाली आहे. त्यातच संक्रमणाचा वेग वाढत असल्यामुळे प्रशासन हतबल झाले आहे. संक्रमण रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तातडीने त्यांना ‘क्वाॅरंटाइन’ करण्यात येत आहे. सध्या तीव्र लक्षणे असणाऱ्या ३१० बाधितांना रुग्णालयात तर सामान्य लक्षणे असणाऱ्या ३८३ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणानेही तालुक्यात वेग घेतला आहे.

१ उपजिल्हा रुग्णालय, १ ग्रामीण रुग्णालय, १ नागरी आरोग्य केंद्र, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमधून नागरिकांना ही लस देण्यात येत आहे. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असून, यापूर्वी साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबरच आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांही लस देण्यात आली आहे. तालुक्यातील ५४ हजार ६९३ जणांना कोविशिल्ड तर ३ हजार २४० जणांना कोव्हॅक्सिन असे एकूण ५७ हजार ९३३ जणांना आजअखेर लसीकरण करण्यात आले आहे.

- चौकट

आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण

हेळगाव : १४९९

इंदोली : २७०५

काले : ३३०३

कोळे : २२५९

मसूर : २२९८

रेठरे : २१२५

सदाशिवगड : २६७५

सुपने : २११२

उंब्रज : ३४०९

वडगाव : २२५०

येवती : १४२०

(उपकेंद्रांसह एकूण)

- चौकट

लसीकरणाचा लेखाजोखा

नागरी केंद्र, कऱ्हाड : २८४०

ग्रामीण रुग्णालय, उंडाळे : १४०३

उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड : १०७९३

सह्याद्री : २२९८

गुजर : ११७०

कृष्णा : ७०५४

कऱ्हाड हॉ. : ११८५

शारदा : ३५८९

श्री : ७०५

कोळेकर : ४८४

सिटी हॉ. : ८०

सिद्धिविनायक : २०२

- चौकट

एकूण लसीकरण - ५७९३३

शासकीय रुग्णालय : ४११८१

खासगी रुग्णालय : १६७५२

- चौकट

लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी : ८९७४ : ४४७३

फ्रंटलाइन वर्कर्स : ४७१४ : २११९

४५ ते ६० वर्ष : १५६३९ : २२८

६० वर्षापुढील : २१४७९ : ३०७

एकूण लसीकरण : ५०८०६ : ७१२७

(आरोग्य विभागाच्या ११ एप्रिलच्या अहवालानुसार)

- कोट

कोरोना लसीकरणाचे तालुक्यात योग्य नियोजन केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती करण्यात येत आहे. लस सुरक्षित असून, नागरिकांनी तातडीने नावनोंदणी करावी.

- संगीता देशमुख

तालुका आरोग्य अधिकारी