शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ST Strike: सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद, प्रवाशांचे हाल 

By जगदीश कोष्टी | Updated: September 3, 2024 16:09 IST

आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता

सातारा : एसटीच्या खासगीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. अधूनमधून गाड्या धावत होत्या. मात्र असंख्य फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह हजारो प्रवासी एसटीची वाट पाहत थांबले होते.राज्य परिवहन महामंडळात खासगी गाड्या येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे एसटीतील तेरा संघटनांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबरपासून बंदचा इशारा दिला होता. यामध्ये सातारा जिल्ह्यातही अनेक बसस्थानकाला फटका बसला आहे. कऱ्हाड, वडूज, मेढा, फलटण, पारगाव-खंडाळा आदी आगारात शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.दरम्यान, सातारा मध्यवर्ती बसस्थानकात अधूनमधून गाड्यांची वर्दळ होती. मात्र ज्या गाड्या सोमवारी इतर जिल्ह्यात मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या आहेत, त्या गाड्या परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात का होईना फायदा झाला आहे. मात्र सायंकाळनंतर आंदोलनाची दाहकता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एसटी महामंडळाच्या भल्यासाठी कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. प्रवाशांचे हाल व्हावेत, असे कोणालाही वाटत नाही. पण, सरकारला याचे काही देणे-घेणे नसल्याने हे आंदोलन करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी चर्चेला बोलावले आहे. त्यानंतर दिशा ठरणार आहे. - शिवाजीराव देशमुख, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरST Strikeएसटी संपpassengerप्रवासी