मलकापूर : आगाशिवनगर येथील डोंगरउतारावरील जमिनीची धूप रोखण्याकरिता पालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आगाशिवनगरात डोंगरउताराला मियावॉकी पद्धतीने वृक्षलागवडीचे काम हाती घेतले आहे. तर शहरातील मोकळी जागा व नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वायूप्रदूषण कमी करण्यासाठी फायदा होणार आहे.
‘माझी वसुंधरा’अंतर्गत दुसरे अभियान सुरू झाले आहे. त्याअंतर्गत पालिकेने नुकतेच अहिल्यादेवी भाजी मंडई येथे वृक्षारोपण करून मलकापुरात या अभियानाचा प्रारंभ केला. तसेच पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी शासनामार्फत वेळोवेळी पर्यावरण संवर्धनाकरिता व विविध योजनांकरिता प्रशासन नेहमीच कटिबद्ध व सज्ज असल्याचे मत मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी व्यक्त केले.
या वेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरसेविका, नगरसेवक, मनीषा फडतरे, सुचित्रा बलवान, रजिया आतार, पुंडलिक ढगे, संपत हुलवान, भानुदास शिंदे, संदीप पोळ, शेखर मुंडे उपस्थित होते.
नगराध्यक्षा येडगे म्हणाल्या, ‘माझी वसुंधरा २०२०-२१ अभियानात पालिकेने राज्यात तृतीय क्रमांक पटकवला. त्यामुळे पालिकेने १ कोटीचे पारितोषिक प्राप्त केले आहे. पंचतत्त्वांचा समतोल राखून पर्यावरण संवर्धन करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सर्वांच्या सहकार्याने शहरात हे अभियान यशस्वी करूया. शहरातील प्रत्येक महिलेने वृक्षलागवड व संवर्धन करावे.’
उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची रोपे लावली. या रोपांना २४ तास नळ पाणीपुरवठा प्रकल्पातील टाक्या साफ केलेले पाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज व पाणी बचत होणार आहे.’
फोटो..
०२मलकापूर वृक्षारोपण
पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेत पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. (छाया : माणिक डोंगरे)
020721\img_20210702_161809.jpg
फोटो कॕप्शन
पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील ओपन स्पेसमधे पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. ( छाया- माणिक डोंगरे)