शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

Satara Politics: ..'हे' समजल्यानेच रामराजे विचलीत झाले, जयकुमार गोरे यांनी लगावला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:00 PM

आमच्या नावाखाली तुमची पापे लपवू नका

दहिवडी : ‘सत्तेची कवचकुंडले नसतील तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलीत झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक नेते आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू नयेत. कुणाच्या तरी पदराआडून असल्या चाली खेळणे बंद करावे,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार रामराजे यांना लगावला.फलटणमधील कार्यक्रमात आमदार रामराजे यांनी जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या सांगण्यावरून भाजप चालणार असेल तर महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार आमदार गोरे यांनी घेतला घेतला.आमदार गोरे म्हणाले, ‘कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन रामराजे महायुती सोडून जा, असे सांगत आहेत. ते स्वतः का थांबले आहेत, ते कुणालाच समजत नाही, अशी त्यांची बाळबोध कल्पना आहे. महायुतीचा प्रयोग करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिलाय. लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी कधी महायुतीला मदत केली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यांची आणि आमची लढाई आजची नाही. २००७ सालापासून आम्ही सत्तेत नसताना, आमच्याकडे काही नसताना न रडता आम्ही ही लढाई लढत आलो आहोत. नेहमी काड्या आणि जाळ घालणारे रामराजे सत्तेत असताना, सभापती असताना त्यांनी आमच्यावर अनेक केसेस घातल्या; पण आम्ही त्यांना कधी यशस्वी होऊ दिले नाही.’

औरंगजेबनीती बंद करा..हरियाणामधील निकालानंतर रामराजे यांचे ‘चीत भी मेरी अन पट भी मेरी’ असे राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात कुणाचीही सत्ता आली तरी आपण सत्तेबरोबर राहावे म्हणून ते चाली खेळत आहेत. आपण एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे अशी दुलदुली औरंगजेबनीती त्यांनी बंद करावी, असेही आमदार गोरे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपाMahayutiमहायुती