उंब्रज : ‘मोदी सरकार हे फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. सध्या जनता कोरोनाच्या संकटाने त्रस्त असताना त्यांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोदीजी तुम्हीच सांगा देश कसा राहणार,’ असा प्रश्न राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी अजितराव पाटील (चिखलीकर) यांनी उपस्थित केला.
केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात कऱ्हाड उत्तर कॉंग्रेसच्या वतीने उंब्रज-मसूर मार्गावरील वडोली भिकेश्वर येथील पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, मधुकर जाधव, प्रताप देशमुख, दुर्गेश मोहिते, विकास जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, उमेश साळुंखे, नंदकुमार जगदाळे, सज्जन यादव, अनिल मोहिते, किशोर गांधी, वसंतराव जाधव उपस्थित होते.
हेमंतराव जाधव म्हणाले, ‘केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढविल्या आहेत. पेट्रोलने शंभरी पार तर डिझेलही शंभरीकडे पोहोचले आहे. ही भाववाढ अशीच सुरू राहिली तर सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे जगणे अवघड होईल.’
सज्जन यादव म्हणाले, ‘इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करीत नाहीत. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले.’
या वेळी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, नंदकुमार जगदाळे, उमेश साळुंखे, कॅ. इंद्रजित जाधव, दुर्गेश मोहिते यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. उमेश साळुंखे यांनी प्रास्तविक केले. यशवंत चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो ०७उंब्रज
कऱ्हाड तालुक्यातील वडोली (भिकेश्वर) येथील पेट्रोल पंपावर सोमवारी कऱ्हाड उत्तर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. (छाया : अजय जाधव)
===Photopath===
070621\img_20210607_111122.jpg
===Caption===
फोटो ओळी - कराड तालुक्यातील वडोली(भिकेश्वर) येथील पेट्रोल पंपावर कराड उत्तर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करताना कॉग्रेसचे पदाधिकारी.