आॅनलाईन लोकमतसातारा, दि. ७: मोरांची आई म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ललीता केसव या अजिंक्यतारा किल्ल्यावरील मोरांचा गेल्या दहा वर्षांपासून सांभाळ करीत आहेत. पदरमोड करून मोरांसाठी खाद्याची व्यवस्था करीत असताना आजपर्यंत अनेक नागरिकांनी त्यांना मोरांसाठी धान्य उपलब्ध करून आर्थिक मदतही केली. आता राष्ट्रीय पक्ष्याच्या संवर्धनासाठी शहरातील काही नागरिकांनी पाउल पुढे टाकले असून मोरांच्या खाद्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यास सुरूवातही केली आहे.अजिंक्यतारा किल्ला हा जैवविविधतेने नटला आहे. या किल्ल्यावर मोर, लांडोर, खारूताई, चिमण्या यांसह अनेक पशू-पक्ष्यांचा अधिवास आहे. अजिंक्यताऱ्याच्या कुशीत राहणाऱ्या ललीता केसव यांना पशू-पक्ष्यांविषयी आवड असल्याने त्यांनी दहा वर्षांपूर्वी किल्ल्यावर असलेल्या पशू-पक्ष्यांना खाद्य म्हणून गहू, तांदूळ, ज्वारी देण्यास सुरूवात केली. तेव्हापासून किल्ल्यावरील मोरांच्या संख्येत वाढ होत गेली. पोटच्या मुलांप्रमाणे त्या या ह्यराष्ट्रीय पक्ष्यांचाह्ण सांभाळ करू लागल्या. त्यांना खाऊ-पिऊ घालू लागल्या. म्हणूनच की काय पंचक्रोशीत त्या मोरांची आई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.प्रारंभी पदरमोड करून पक्ष्यांसाठी अन्न-धान्य आणणाऱ्या मोरांच्या आईला आज किल्ल्यावर फेरफटका मारणाऱ्या अनेक व्यक्ती धान्य देतात. कोणी आर्थिक स्वरूपात मदतही करतात. राष्ट्रीय पक्षी जगविण्यसाठी ललीता केसव यांच्या सुरू असलेल्या या कायार्ला बळ देण्यासाठी आता नागरिकांनी पाऊल पुढे टाकले आहे. यादोगोपाळ पेठेतील आदी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शहा, गोळवीलकर, कुलकर्णी, देशपांडे आदी कुुटुंबियांनी लोकवर्गनी जमा करून ती ललीता केसव यांच्याकडे छोटेखानी कार्यक्रमात सुपुर्द केली.या लोकवर्गणीतून मोरांसाठी खाद्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याही पुढे मोरांच्या व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती येथील रहिवाश्यांनी दिली.
वृक्षलागवडीचा संकल्प !
अजिंक्यतारा किल्ला जैवविविधतेने नटला आहे. येथील पर्यावरणाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी, किल्ल्यावर आजपर्यंत अनेकदा वृक्षारोपण केले असून त्यांचे संवर्धनही केले आहे. याही वर्षी नागरिकांच्या सहकायार्ने वृक्षलागवड केली आहे. अजुनही अनेक ठिकाणी वृक्षालागवड करण्याचा मानस आहे. यासाठी प्रशासन अथवा सामाजिक संघटनांकडून रोपे उबलब्ध झाल्यास खऱ्या अथार्ने पर्यावरणपूरक उपक्रमाला बळ मिळेल, अशी अपेक्षा ललीता केसव यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.मोरांना खाद्यान्न पुरविण्यासाठी नागरिकांनी केलेली मदत अतुलनीय आहे. नागरिकांच्या सहकायार्मुळेच मोरांचा सांभाळ करण्याची उर्जा मिळते. शासनाकडून मदत मिळाल्यास मुक्या पशू-पक्ष्यांचा सांभाळ व वनसंवर्धनाच्या कार्यास मोठा हातभार लागेल.
- ललीता केसव, मोरांची आई