शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

तब्बल दहा तास ऐंशी हातांनी मोजले पैसे

By admin | Published: July 01, 2015 9:27 PM

क्षेत्र महाबळेश्वर : एप्रिल ते जूनअखेर दानशूरांनी दिली दहा लाखांची भेट; परदेशी चलनाचाही समावेश

महाबळेश्वर : हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली मंदिरे अन् दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम दान केली आहे. एप्रिल ते जून या महिन्यांत क्षेत्रमहाबळेश्वरला भेट दिलेल्या भाविक, पर्यटकांनी दान केलेली ही रक्कम असून यामध्ये परदेशी चलनाचाही समावेश आहे, चाळीस नागरिकांनी दहा तासाच ही रक्कम मोजली. अशी माहिती तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी दिली. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर हे प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सुमारे पंधरा ते सोळा लाख पर्यटक भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घेतात. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर अंतरावर क्षेत्रमहाबळेश्वर हे पौराणिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्यांचा उगम याठिकाणी झाला आहे. याच ठिकाणी महाबळ व अतिबळ या दैत्यांची हेमाडपंथी मंदिरे आहेत. याठिकाणी शंभूमहादेवांनी दैत्यांचा पराभव केला, येथे शंभूमहादेवाचा वास आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.मंदिराच्या देखभालीसाठी राज्य शासनाचा ट्रस्ट आहे. जिल्हा न्यायाधीश ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असून प्रांत, तहसीलदार, नगराध्यक्ष व सरकारी वकील हे संचालक आहेत. क्षेत्रमहाबळेश्वर मंदिरातील दानपेटी दर तीन महिन्यांनी उघडली जाते. एप्रिल ते जूनअखेर दानपेटी व अभिषेक देणगीरूपाने ट्रस्टला १० लाख १० हजार ५१ रुपये मिळाले आहेत, अशी माहिती तहसीलदार म्हेत्रे यांनी दिली. दानपेटीतील रक्कम तहसीलदार कार्यालयात आणून ४० लोकांकडून मोजण्यात आली. दानपेटीत जमा झालेल्या रकमेत धीरम, युरो आदी परदेशी चलनांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)वाहनतळाचेही ट्रस्टला उत्पन्नक्षेत्रमहाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या वाहनतळाच्या माध्यमातूनही मोठे उत्पन्न ट्रस्टला मिळते. यातून मंदिर परिसर व गावात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. मंदिरांची गळती काढण्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडून सहा लाख रुपये खर्च केले आहेत.मंदिरांना दिले मूळ रूपक्षेत्रमहाबळेश्वर मंदिरात सुशोभीकरणाच्या नावाखाली बसविण्यात आलेल्या आकर्षक फरशी काढून मंदिराला मूळ रूप देण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर अतिशय भव्य व मनमोहक दिसत आहे.