शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Satara: कास पुष्प पठारावर पावसाळी पर्यटन खुले, फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 12:11 PM

कुमुदिनी तलाव पर्यटकांचे आकर्षण : प्रतिव्यक्ती पन्नास रुपये तात्पुरती शुल्क आकारणी 

पेट्री : जागतिक वारसास्थळ कास पठारावरकास पठार कार्यकारी समिती, वनविभागाच्यावतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले असून पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे वातावरण आहे. नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान, कुमुदिनी तलाव विविध पॉईंटकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, पावसाची संततधार, धुक्याची दुलई, कोसळणारे धबधबे, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पठार, कास धरण पर्यटनस्थळी जिल्हा, राज्यभरातून पर्यटकांची वर्दळ सुरू असून पठारावरील विविध पॉईंट पाहण्याची मागणी पर्यटक करत होते. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत यासाठी सुरक्षिततेसाठी कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत आहेत. पठाराचे संवर्धन, संगोपन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू आहे.जुन-ऑक्टोबर दरम्यान तृण, कंद, वेली, वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विविधरंगी दुर्मिळ फुलांचे गालिचे पर्यटकांना आकर्षित करतात. काही तुरळक फुलांचा, कुमुदिनीच्या फुलांचा सूर्योदय मावळेपर्यंत नोव्हेंबर जातो.फुलांसाठी सध्या पोषक वातावरण असून अद्याप फुलांचा हंगाम सुरू नसून ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने राजमार्गावरून कुमुदिनी तलाव, कास धरण दर्शन मचान, नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे पॉईंट पर्यटकांसाठी खुले झाल्यामुळे पर्यटकांना कासचे पर्यटन घडत आहे. पर्यटकांसमवेत सुरक्षा कर्मचारी असून सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पर्यटन सुरू आहे.

कास पठार-राजमार्गावर निवाराशेड, स्वच्छतागृहांची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी, संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वाॅकीटाॅकीद्वारे संपर्क, अशा अनेकविध सुविधा पावसाळी पर्यटनात उपलब्ध आहेत. परंतु कुमुदिनी तलाव परिसरात निवाऱ्याची कसलीच सोय नसल्याने ऊन, वारा, पावसात आबालवृद्धांपर्यंतची निवाऱ्याची सोय होण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.

फुलांच्या क्षेत्रात फिरण्यास बंदी !पठारावरील विविध पॉईंट पाहण्यास कास पठार खुले आहे. फुलांच्या राखीव क्षेत्रात पर्यटनास पूर्णतः बंदी असून कोणी प्रवेश केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून प्रति व्यक्ती पन्नास रुपये तात्पुरते शुल्क आकारून पावसाळी पर्यटन येत्या फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

वनसंपदेचे रक्षण, पर्यटकांना सोयीसुविधा, स्थानिकांना रोजगाराचे उद्दिष्ट ठेवून विविध पॉईंटच्या निसर्गसौंदर्याचा आनंद मिळण्याच्या हेतूने पर्यटकांच्या मागणीनुसार पावसाळी पर्यटन सुरू केले. पर्यटनावेळी फुलांच्या क्षेत्रात प्रवेश होणार नाही, याची दक्षता घेऊन वनविभागाच्या सूचनांचे पालन करून समिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. -सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKas Patharकास पठारtourismपर्यटन